Breaking

Monday, August 22, 2022

मुंबईच्या गोविंदांवर शोककळा, विलेपार्लेतील संदेश दळवी या तरुणाचा मृत्यू https://ift.tt/Hg3wz1u

मुंबई : राज्यात दोन दिवसांपूर्वी दहिहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. राज्य सरकारनं सुरुवातीला दहिहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना १० लाखांचं विमा संरक्षण देणार असल्याची सुरुवातीला घोषणा केली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळं एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दहिहंडीमध्ये जखमी झालेल्या मुंबईतील एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. संदेश दळवी, असं मृत्यू झालेल्या गोविंदाचं नावं आहे. संदेशच्या डोक्याला इजा झाली होती. रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात अँडमिट केल होतं. डोक्याची शस्रक्रिया झाली होती, पण गंभीर दुखापत झाल्यानं संदेश दळवीची झुंज अपयशी ठरली. संदेश दळवीचा रुग्णालयातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र जनावणे यांनी उपचारासाठी मदत केली असल्याचं त्यामध्ये दिसून येतं. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर यांनी संदेश दळवीच्या कुटुंबाला मदत केली जाईल, असं म्हटलं. दहीहंडी उत्सवादरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. संदेश दळवी असे या तरुणाचे नाव आहे. विलेपार्ले पूर्वेकडील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. संदेश हा विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकात सामील होता. हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले पूर्वेकडील बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. यावेळी दहीहंडीच्या सर्वात वरील सातव्या थरावरून कोसळून संदेश जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संदेश दळवी हा मूळचा विले पार्ले येथील असून काही दिवसांपूर्वी त्याचं कुटुंब कुर्ला येथे राहायला गेले होते. व्हायरल होणारा व्हिडिओ मंडळाच्या तरुणांनी त्याला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची तब्येत सुधारत नसल्याने रविवारी दुपारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९ वाजता संदेशचे निधन झाले. तर याच पथकातील विनायक रामवाडे हा तरुणही जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संदेश हा रिक्षा चालकाचे काम करत होता. तर त्याचे वडीलही रिक्षा चालक होते. त्याची आई ही घरकाम करत असे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान दुर्घटनेनंतर याप्रकरणी पोलिसांनी दहीहंडी आयोजकाविरोधात गुन्हा नोंदविला होता. संदेशच्या मृत्यूनंतर आता निष्काळजीपणामुळे मृत्यूस जबाबदार झाल्याप्रकरणीचे कलम पोलिसांकडून या गुन्हात समाविष्ट केले जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांनी दिली. गिरीश महाजन काय म्हणाले ? गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दोन दिवस कूपर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. संदेश दळवीच्या कुटुंबीयांनी त्याला नानावटीत आज नेलं होतं. दळवी याच्या कुटुंबाला १० लाखांची मदत तर होणार आहेच. पण त्याच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आवश्यकता असेल तर या पूर्ण घटनेची चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी मंडळासोबत आज चर्चा केली आहे. या घटनेत नियमावली पालन झालं की नाही याची चौकशी करणार असल्याचं ते म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FfDdNXl

No comments:

Post a Comment