म.टा. प्रतिनिधी, नागपूर कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडद ते बुटीबोरी मार्गावर मोठी कारवाई करत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध दारूची पकडली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या डोळ्यात धूळ फेकून अवैध मद्य तस्करी करता यावी यासाठी तस्करांनी ट्रकचे डिझाइनच बदलले होते. मात्र सहा चाकी ट्रकची लांबी कमी का, असा संशय आल्याने पथकाने तपासणी केली असता मद्याच्या चोरट्या वाहतुकीसाठी स्वतंत्र कप्पा तयार करण्यात आल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण ३० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ‘’ स्टाइलने होत असलेल्या या तस्करीमुळे अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. officials of excise department caught मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या उमरेड येथील विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारावर निरीक्षक विजयकुमार थोरात यांनी विशेष पथकाद्वारे शोध व गस्त मोहीम हाती घेतली. कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडद ते बुटीबोरी मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजुला मोकळ्या परिसरात सहाचाकी ट्रक आढळून आला. क्लिक करा आणि वाचा- या ट्रकच्या आतील बाजूची लांबी कमी होती. ड्रायव्हर सिटच्या मागच्या बाजूला मद्याची चोरटी वाहतूक करण्यासाठी नटबोल्टनी कसलेला स्वतंत्र कप्पा आढळून आला. नटबोल्ट काढून बघितले असता त्यात २०० लिटर क्षमतेच्या १० ड्रममध्ये मद्यार्क आढळून आले. माल जप्त करण्यात आला, मात्र ट्रकचा मालक संजय कदम फरार आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ए) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- ही कारवाई आयुक्त कांतिलाल उमाप, उपआयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक सुरेंद्र मनपिया, उपअधीक्षक मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयकुमार थोरात, नरेंद्र थोरात, प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक प्रशांत वानखेडे, मुकूंद चिटमटवार यांच्या पथकाने केली. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mH1Kt42
No comments:
Post a Comment