मॉस्को : रशियातील जन्मदर घटल्यानं लोकसंख्येच्या समस्यांना त्यांना सामोरं जाव लागत आहे. रशियाची लोकसंख्या वेगानं कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं रशिया जगातील सर्वात मोठा देश आहे. मात्र, रशियाची लोकसंख्या मात्र १४ कोटी ४१ लाख आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोव्हिएत यूनियनच्या काळातील मदर हिरोईन योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुतीन यांनी या संबंधातील आदेशावर सही देखील केली आहे. ज्या महिला १० मुलांना जन्म देतील आणि त्यांचा सांभाळ करतील त्यांना मदर हिरोईन आणि १३ लाख रुपये दिले जातील, असं ते म्हणाले. १० व्या मुलाच्या जन्मानंतर १३ लाख रुपये मिळणार स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टनुसार १० वं मुल १ वर्षाचं झाल्यानंतर संबंधित महिलेला १३ लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. पहिल्या ९ मुलांपैकी एखाद्या मुलाचा दहशतवादी हल्ला किंवा इतर घटनांमुळं मृत्यू झाल्यास तरी देखील संबंधित महिलेला मदर हिरोईन पुरस्कार दिला झाणार आहे. पुतीन यांचा या पुरस्काराद्वारे लोकसंख्या वाढीचा दर वाढवण्याचा प्रयत्न आहे. १९४४ मध्ये सुरु झालेली योजना मदर हिरोईन ही योजना १९४४ मध्ये सोव्हिएत यूनियनचा नेता जोसेफ स्टॅलिन यांनी सुरु केली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाची लोकसंख्या वेगानं घटू लागली होती. त्यामुळं त्यावेळी लोकसंख्या वाढीसाठी सरकारनं ही योजना सुरु केली होती. १९९१ मध्ये रशियाचं विभाजन झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली होती. २००० मध्ये पुतीन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर देखील लोकसंख्या घट सुरुच आहे. त्यावेळी १० वर्षात परिस्थिती बदलेलं असं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्याचा परिणाम दिसून आला नाही. अर्थशास्त्रज्ञांनी देखील रशियाच्या घटत्या लोकंसख्येचा फटका बसेल, असा इशारा दिल्यानंतर रशियाच्या अध्यक्षांनी १९५० च्या दशकातील योजना सुरु केली आहे. रशियाच्या लोकसंख्येत घट रशियाची लोकसंख्या वेगानं घटत आहे. २०२२ च्या सुरवातीला लोकंसख्या ४ लाखांनी घटली असल्याची माहिती समोर आली आहे. रशियात १९९० पासून लोकसंख्येत घट दिसून येत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/R2cVtNA
No comments:
Post a Comment