ब्रिस्बेन : राष्ट्रकुलमध्ये क्रिकेट खेळवण्यात आले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील अंतिम फेरी चांगलीच रंगली. आता राष्ट्रकुलनंतर ऑलिम्पिकमध्येही क्रिकेट खेळवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण यासाठी आता एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०३२ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. २०३२ मध्ये ब्रिस्बेनला ऑलिम्पिक होणार आहे. देशातील क्रिकेटची लोकप्रियता वाढल्यास क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळू शकेल, असा क्रिकेट ऑस्ट्रेलिया पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. वाचा- क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ५ ते १२ वर्षाच्या मुलांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. सध्या या वयोगटातील ६० हजार मुले क्रिकेट खेळत आहेत. पाच वर्षात ही संख्या दोन लाखाच्या पार गेल्यास ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश शक्य होईल, असा क्रिकेट ऑस्ट्रेलियास विश्वास आहे. यापूर्वी १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान होते. वाचा- आयसीसीने २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकचे लक्ष्य बाळगले आहे. त्यासाठी संयोजकांसमोर या महिन्यात चर्चाही होण्याची शक्यता आहे. लॉस एंजलिस संयोजक आठ खेळांच्या प्रतिनिधींसह चर्चा करणार आहेत. त्यात क्रिकेटलाही स्थान देण्यात आले आहे. यजमान शहरास खेळांचा समावेश करण्याचा आधिकार आहे. मात्र त्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची मान्यता आवश्यक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांची टी-२० क्रिकेट स्पर्धा झाली. त्यात ऑस्ट्रेलियाने भारतास हरवून सुवर्णपदक जिंकले. ब्रिस्बेनच्या गॅबा क्रिकेट मैदानाचे ऑलिम्पिक स्टेडियममध्ये रुपांतर होणार आहे. तिथेच उद्घाटन आणि समारोप सोहळा होणार आहे. त्यामुळे क्रिकेटला स्थान देण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे. आयसीसीच्या स्पर्धात विजेतेपद जिंकल्यास खेळाची ऑस्ट्रेलियातील लोकप्रियता वाढेल, असाही त्यांना विश्वास आहे. आतापर्यंत क्रिकेट हा खेळ कधीही ऑलिम्पिकमध्ये खेळवला गेला नाही. क्रिकेट खेळणारे देश कमी असल्यामुळे या खेळाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळणार नाही, असे म्हटले जात होते. पण आता २०३२ पर्यंत किती देश क्रिकेट खेळायला सुरुवात करतात, यावर ही गोष्ट अवलंबून असू शकते. त्यामुळे आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणरा की नाही, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SZHChjQ
No comments:
Post a Comment