Breaking

Monday, August 15, 2022

गोंदियात ३६ तासापासून कोसळधार, जिल्ह्यात रेड अलर्ट, छत्तीसगडला जाणारे १३५ प्रवासी अडकले https://ift.tt/nB053Kb

गोंदिया: गोंदियात पावसामुळे सालेकसा मार्गे छत्तीसगडला जाणारे तब्बल १३५ प्रवासी अडकून पडले आहेत. या १३५ प्रवाशांची गावकऱ्यांनी व्यवस्था केली. बेवरटोला-पुजारीटोला धरणातून पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु असल्याने रस्त्यावर पाणी आलं आहे. त्यामुळे गोंदियाकडून सालेकसा मार्गे छत्तीसगडला जाणारा मार्ग बंद झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या ३६ तासापासून पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, धरण ओवरफ्लो होऊन वाहत आहे. दरम्यान, सालेकसा तालुक्यातील बेवरटोला आणि पुजारीटोला धरणातून पाण्याचा सतत विसर्ग सुरु असल्याने रस्त्यावर पाणी आलं आहे. त्यामुळे गोंदियाकडून सालेकसा मार्गे छत्तीसगडला जाणारा मार्ग बंद झाला आहे. हेही वाचा - त्यामुळे सालेकसा मार्गे छत्तीसगडला जाणारे प्रवासी सालेकसा शहरात अडकून पडले आहेत. सालेकसामधून जाणारे तिन्ही मार्ग बंद असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पुजारी टोला धरणाच्या विसर्गामुळे तिरखेडी पुलावरुन पाणी आल्याने सालेकसा-देवरी मार्ग बंद आहे. तर, बेवरटोला धरण ओवरफ्लो झाल्याने सालेकसा-डोंगरगड, छत्तीसगड मार्ग बंद आहेत. तर सालेकसा- गोंदिया मार्गही याच धरणामुळे बंद पडला आहे. हे तिन्ही मार्ग बंद असल्याने याच मार्गे जाणारे तब्बल १३५ प्रवासी अडकून पडले आहेत. हेही वाचा - हे प्रवासी अडकल्याने गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. या सर्व प्रवाशांची अर्धेनारेश्वर मंदिरात ७० लोकांची, गडमाता मंदिरात ४० लोकांची, सालेकसा येथे संजय बारसे ११ लोक तर मेंढे यांच्या घरी १४ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात नागपूर, भंडारा, लांजी आणि हाजराफॉल येथे आलेले पर्यटक असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील मार्ग सुरु झाल्यास प्रवासी स्थलांतरीत होतील असे सांगण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/buJptG4

No comments:

Post a Comment