: जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या चारगाव बुद्रुक येथील तलावात दोन यूवकांचा बुडून मृत्यू () झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. काढण्याचा नादात जीव गेल्याचे बोलले जात आहे. हार्दिक विनायक गुळघाने ( वय १९ वर्षे ) आणि आयूष चीळे ( वय १९ ) असे मृतकांची नावे आहेत. या घटनेने वरोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे. ( due to tipping over in Chandrapur) या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील हार्दिक गूळघाणे, आयूष चीळे, श्वेतम जयस्वाल, मयूर पारखी आणि आश्रय गोळगोंडे हे पाच तरुण बुद्रुक येथील तलावाजवळ करीत होते. तलावाचा पाळीवर फोटोसेशन करीत असताना सेल्फी काढण्याच्या नादात हार्दिक गुळघाने याचा तोल गेल्या आणि तो तलावात पडला. क्लिक करा आणि वाचा- हार्दिकला पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. हार्दिक तलावात बुडत आहे असे मित्रांच्या लक्षात आले. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिळे याने तलावात उडी घेतली. मात्र, हार्दिकला वाचवण्याच्या प्रयत्नात हार्दिकसह आयुषचा देखील दुदैवी मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. हार्दिक आणि आयूष यांचा मृतदेहाचा शोध घेणे सूरू आहे. या घटनेने वरोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TQ0ZjaG
No comments:
Post a Comment