Breaking

Thursday, August 25, 2022

नाशिक हादरले; भर दिवसा प्रेयसीवर खुनी हल्ला, सोबत राहण्यास नकार दिल्याने आला राग https://ift.tt/QOPxuG9

नाशिक : नाशिकचा पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर तिच्याच मित्राने खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला करणारी व्यक्ती आणि या महिला यांचे प्रेम संबंध होते. मात्र या महिलेने या इसमाला सोबत राहण्यास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. (There has been a murderous attack on a woman in Nashik) नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या जाधव पेट्रोलियम येथे काम करणाऱ्या जुबेदा युसूफ खान या ३७ वर्षीय महिलेचे प्रमोद प्रकाश गोसावी याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रमोद प्रकाश गोसावी यानेच जुबेदावर खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुबेदा खान आणि प्रमोद गोसावी यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र, एका बलात्काराच्या गुन्ह्यात प्रमोद गोसावी याला अटक झाल्यानंतर या महिलेने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. आपल्या सोबत राहण्यास जुबेदाने नकार दिल्याने प्रमोदला प्रचंड राग आला होता. याच रागातून या संशयित आरोपीने या महिलेला ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन याचा जाब विचारला. त्यावेळी त्याने जुबेदावर खुनी हल्ला केला. भर दिवसा घडलेला हा सगळा प्रकार या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर जखमी जुबेदा खान हिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात या महिलेच्या डोक्यावर आणि पायावर चाकुचे वार असल्याने तिला पुढील उपचारासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापनाने खाजगी रुग्णालयात हलवले आहे. दरम्यान, एका सराईत गुन्हेगाराकडून भर दिवसा एका महिलेवर झालेल्या खुनी हल्ल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mjwBONP

No comments:

Post a Comment