Breaking

Wednesday, August 24, 2022

पबजीने बना दी जोडी! गेम खेळताना प्रेम झालं; तिनं घर सोडलं, ८७० किमी अंतर कापलं अन् मग... https://ift.tt/aRSB4mX

रायसेन: ऑनलाईन गेमच्या नादात डोक्यावर परिणाम झाल्याच्या, आत्महत्या केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे फसवणूक झाल्याचे प्रकारही तुम्ही वाचले असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मात्र मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये याच्या अगदी उलट घडलं आहे. ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आता लग्नाला महिना झाला आहे. दोघांचा संसार अगदी आनंदात सुरू आहे. रायसेनमधील एक तरुण खेळता खेळता नैनितालमधील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोन वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर तरुणी नैनितालहून पळाली आणि रायसेनला आली. दोघांनी लग्न केलं. तरुणीचा ठावठिकाणा सापडत नसल्यानं नैनितालमध्ये असलेल्या तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. नैनिताल पोलीस तरुणीला माघारी नेण्यासाठी रायसेनला परतले. त्यावेळी तरुणीनं घरी जाण्यास नकार दिला. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये वास्तव्यास असलेला तरुण दीड वर्षांपूर्वी पबजी खेळता खेळता उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये राहणाऱ्या शीतलच्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. व्हॉट्स चॅटपासून सुरू झालेलं संभाषण व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचलं. लग्नाआधी दोघे एकदाच भेटले होते. महिन्याभरापूर्वी त्यांनी भोपाळमध्ये लग्न केलं आणि सोबत राहू लागले. नैनितालमध्ये बीएससीचा अभ्यास करताना शीतलला पबजी खेळण्याची सवय लागली. गेम खेळता खेळता ती योगेशच्या संपर्कात आली. दोन वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर शीतल नैनितालहून पळून रायसेनला आली आणि दोघांनी लग्न केलं. कुटुंबियांच्या तक्रारीवरून नैनिताल पोलीस शीतलला नेण्यासाठी आले. मात्र तिनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं असल्यानं, ती सज्ञान असल्यानं पोलिसांना तिच्याशिवाय परतावं लागलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pXUdIna

No comments:

Post a Comment