Breaking

Tuesday, August 23, 2022

अदानी ग्रुपची NDTV मध्ये २९. १८ टक्के भागिदारी खरेदीची घोषणा, वाहिनीच्या प्रमोटर्सची बाजू समोर https://ift.tt/rmBGvZ8

नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपकडून न्यू दिल्ली नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड विकत घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. अदानी एंटरप्रायझेसच्या एमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडकडून अप्रत्यक्षपणे NDTV मधील २९.१८ टक्के हिस्सा खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अदानी ग्रुपकडून मीडिया हाऊसमध्ये 26 टक्के स्टेकसाठी खुली ऑफरही सुरू करणार आहे. अदानी ग्रुपची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड हा करार करणार आहे. एनडीटीव्हीकडून प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांची बाजू देखील समोर आली आहे. आम्हाला कसलिही माहिती, सूचना, नोटीस न देता अदानी ग्रुपकडून घोषणा करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आम्ही पत्रकारितेशी तडजोड करणार नसल्याचं ते म्हणाले. एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड ही अदानी समूहाची मीडिया कंपनी आहे. एएमएएल ही अदानी एंटरप्रायझेच्या मालकीची उपकंपनी आहे. एएमएनएल अप्रत्यक्षपणे एनडीटीव्ही मधील 29.18 टक्के हिस्सा खरेदी करेल. खरं तर, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या अदानींच्या उद्योग समुहातील एएमएनएलच्या उपकंपनी द्वारे एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांची कंपनी आरआरपीआर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ९९.५ टक्के इक्विटी शेअर्स विकत घेण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अदानींच्या तीन कंपन्या ओपन ऑफर आणणार एएमएनएल, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि वीसीपीएलकडून एनडीटीव्हीमध्ये २६ टक्के भागिदारी खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर आणली जाणार आहे. सेबीच्या नियमांचं पालन करण्यासाठी हे केलं जाणार आहे. एनडीटीव्हीचे इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी भागिदारांना २९४ रुपये प्रतिशेअर्स देण्याचा प्रस्ताव अदानी समुहाकडून देण्यात आला आहे. एनडीटीव्हीकडे तीन वाहिन्या एनडीटीव्ही समुहाद्वारे सध्या तीन वाहिन्या चालवल्या जातात. एनडीटीव्ही २४x७, एनडीटीव्ही इंडिया, एनडीटीव्ही प्रॉफिट याचा समावेश त्यामध्ये आहे. सध्या एनडीटीव्हीचे प्रमोटर्स आरआरपीआर यांच्याकडे २९.२८ टक्के शेअर्स आहेत. हे शेअर्स अदानी ग्रुप विकत घेणार आहे. एनडीटीव्हीची बाजू समोर एनडीटीव्हीचे संस्थापक प्रमोटर्स प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांना विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडनं त्यांची २९.१८ टक्के भागिदारी घेतल्याचं नोटीस दिलं. दोन दिवसांमध्ये शेअर्स व्हीसीपीएलला वर्ग करावेत असं सांगण्यात आलं. हे २००९-१० मधील एका कर्जाच्या माध्यमातून हे करण्यात आल्याचं रॉय यांच्याकडून सांगण्यात आलं. प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांना विश्वासात न घेता, पूर्वकल्पना न देता, संस्थापकांची सहमती न घेता करण्यात आलं आहे. आम्हाला हा प्रकार आज समजला आहे. दरम्यान, एनडीटीव्हीनं स्टॉक एक्सेंजला संस्थापकांच्या शेअर्समध्ये बदल करु नयेत, असं सांगितलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bopA0rX

No comments:

Post a Comment