लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जानवळचे सुपूत्र भारतीय लष्करातील जवान मच्छिंद्र चोपोलीकर हे भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत होते. मच्छिंद्र चापोलीकर यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. चापोलीकर याचं दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे. २१ ऑगस्ट रोजी त्यांचे पार्थिव जानवळ या गावी आणण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांचे मावस बंधू जनक शेवाळे यांनी दिली. या घटनेची माहिती सोशल सोशल मीडियावर आज व्हायरल होत आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला काहीच नसल्याचे समजते. भारतीय सीमेवर देशाची सेवा करणाऱ्या जिल्ह्यातील एका जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण येते. मात्र, प्रशासनाला त्याची माहिती मिळत नाही, अशा चर्चा लातूरच्या नागरिकांमध्ये सुरु आहेत. मच्छिंद्र चापोलीकर यांचं पार्थिव उद्या येणार मच्छिंद्र चापोलीकर यांचं पार्थिव उद्या लातूर जिल्ह्यातील मूळगावी दाखल आणलं जाणार आहे. मच्छिंद्र चापोलीकर यांच्या निधनानं जानवळ गावावर शोककळा पसरलीय. प्रशासन राज्यपालांच्या दौऱ्यात व्यस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा लातूर - बीड -लातूर असा दोन दिवसीय दौरा सुरु होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौर्याच्या नियोजनात लातूर जिल्हा प्रशासन व्यस्त होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर लातूरकर नाराजी व्यक्त करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FJhXwZ3
No comments:
Post a Comment