नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात झुलान क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पण महिला क्रिकेटला अलविदा केल्यावर झुलान ही पुरुषांच्या आयपीएलमध्ये मोठी जबाबदारी पार पाडणार आहे, असे संकेत मिळत आहेत. भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी २४ सप्टेंबरला इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर लॉर्ड्स येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. ती महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५२ बळी घेणारी गोलंदाज म्हणून ओळखली जाते आणि तिची ही ओळख कायम राहू शकते. जुलैमध्ये झालेल्या श्रीलंकेतील वनडे सामन्यांच्या मालिकेला झुलनला मुकावे लागले होते. पण आता इंग्लंडमधील तीन एकदिवसीय सामन्यांसाठी तिला संघात स्थान देण्यात आले आहे. ही तिची अखेरची मालिका ठरणार आहे. झुलनने निवृत्तीनंतचे आपले प्लॅन्स बनवले आहेत. झुलन ही निवृत्तीनंतर पुरुषांच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळू शकते. सध्याच्या घडीला झुलनची प्राथमिक स्थरावर याबाबत बोलणी सुरु आहेत. झुलन पुरुषांच्या आयपीएलमधील एका संघात मेंटर (मार्गदर्शक) ही भूमिका बजावणार असल्याचे समोर येत आहे. सध्याच्या घडीला झुलन ही बंगालच्या संघामध्ये या भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर झुलनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे झुलन ही गोष्ट समर्थपणे करू शकते, असा विश्वास बऱ्याच जणांना आहे. झुलनने भारताच्या महिला क्रिकेटमध्ये आपला एक अमीट असा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत सर्वात जास्त अनुभव तिच्याकडे आहेच, पण सर्वाधिक बळीही तिच्याच नावावर आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये तिच्या अनुभवाचा चांगलाच फायदा खेळाडूंना होऊ शकतो. जर झुलानला पुरुषांच्या आयपीएलमध्ये मेंटर हे पद देण्यात आले तर आयपीएलमध्ये हे पद भूषवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरू शकते. त्यामुळे आता झुलन कोणत्या संघाची मेंटर होणार आहे, याची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट विश्वाला लागलेली असेल. पण त्यासाठी आता आयपीएलच्या आगामी मोसमामध्येच समजू शकेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iWag4rE
No comments:
Post a Comment