दुबई: दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या आशिया कप सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव बनवून ठेवला. त्यामुळे पाकिस्तानी संघासमोर जास्तीत जास्त धावा करण्याचे आव्हान उभे ठाकले होते. पाकिस्तानी संघ १४७ धावा करत ऑल आऊट झाला. टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम खेळ दाखवणारा कर्णधार बाबर आझम यावेळी अपयशी ठरला आहे. बाबर आझमला फक्त १० धावा करता आल्या आणि डावाच्या तिसऱ्या षटकात तो आऊट झाला. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बाबर आझमचे सर्व डावपेच उद्ध्वस्त केले. बाबर आझम शॉर्ट बॉलवर पुल करायला गेला, तेव्हा चेंडू त्याच्या बॅटच्या काठावर आदळला आणि त्याने त्याचा झेल अर्शदीप सिंगकडे दिला. त्याने आपल्या डावात फक्त ९ चेंडू खेळले, ज्यात त्याने २ चौकार मारून १० धावा केल्या. चाहत्यांनी बाबर आझमला ट्रोल केले भारताविरुद्धच्या अपयशामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. चाहत्यांनी त्याला त्याच्या एका ट्विटची आठवण करून दिली, जे त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी केले होते. विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत असताना बाबर आझमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते आणि लिहिले होते की, ही वाईट वेळही निघून जाईल, तू मजबूत राहा. आता चाहत्यांनी बाबरला त्याच ट्विटची आठवण करून दिली आणि तुम्हीही मजबूत राहा असे म्हटले आहे. दरम्यान, बाबर आझमचा ड्रेसिंग रुममध्ये बसलेला फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो खूपच हैराण आणि दुःखी दिसत आहे. लोकांनी त्याची मजा घेत लिहिले की, या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासात बरेच काही घडले आहे, ऋषभ पंत संघाबाहेर आहे, रिव्ह्यू देखील घेतले जात आहेत आणि आता बाबर आझम आऊट झाला आहे. भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान. पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/th9JwYs
No comments:
Post a Comment