दुबई: भारत विरुद्ध पाकिस्तान हा सुरू असलेला सामना वेळेगाणिक अधिकच रंगतदार होत चालला आहे. आजच्या सामन्यात नेमकं बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण या सामन्यात संघातील एक खेळाडूने एक नाव विक्रम आपल्या नावे केला आहे. आपल्या खराब फॉर्ममुळे गेला बराच काळ सर्वांचे टीकास्त्र सहन करणारा विराट कोहळी आजच्या सामन्यात चांगली खेळी करताना दिसला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने च्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १०० सामने खेळणारा कोहली भारताकडून दुसरा फलंदाज तसेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी १०० सामने खेळणारा पहिला फलंदाज ठरला. विराट कोहलीने रचला इतिहास, रोहितची बरोबरी विराट कोहलीच्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीची सामन्यांची संख्या १०० वर पोहोचली आहे, तर त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत १०२ कसोटी सामने आणि २६२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतासाठी १०० टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारतासाठी १०० हून अधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने रॉस टेलरशी बरोबरी केली जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या आधी आपल्या देशासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळण्याचा विक्रम न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रॉस टेलरच्या नावावर होता. रॉस टेलर हा आपल्या देशासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू होता, परंतु आता विराट कोहलीने त्याची बरोबरी केली आहे आणि आपल्या देशासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी २० मध्ये १०० सामने खेळणारा फलंदाज बनला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0t25Jdm
No comments:
Post a Comment