: वीजेच्या तार (electric wire) अंगावर पडून एका तरुणासह दोघेजण ठार झाल्याची घटना शहरात घडली आहे. या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शेतामध्ये मळणी करत असताना हा प्रकार घडला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Two persons have died on the spot due to falling in Sangli) जत शहरातल्या घाडगेवाडी रोडवरील पाटीलमळा या ठिकाणी वीज वितरण कंपनीची विजेची तार तुटून थेट अंगावर पडली. या दुर्घटनेत एक २६ वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय मुलगा जागीच ठार झाले आहेत. तर, यात एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. रोहित अजित पाटील, (वय १६ वर्षे) आणि शिवाजी पांडुरंग महारनुर, (वय २६ वर्षे),असे दोघा मृतांची नावं आहेत. तर या घटनेमध्ये रोहित पाटील याची आई गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. क्लिक करा आणि वाचा- हे सर्वजण शेतामध्ये मळणी करत होते. यावेळी शेतातून गेलेली ११ केव्ही विजेची मेन लाईनची तार तुटली. ती रोहित पाटील यांच्या अंगावर पडली. यावेळी त्याला बाजूला करत असताना शिवाजी महारणूर यालाही विजेचा जोरदार झटका बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- यावेळी मुलगा रोहित याला वाचवताना त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोघांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5meVkNs
No comments:
Post a Comment