Breaking

Saturday, August 27, 2022

पुणे दौऱ्याची उलट सुलट चर्चा, सुरेश भटांच्या ओळींचा सहारा, तानाजी सावंतांची भूमिका अखेर समोर https://ift.tt/lI61Xta

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या २७ आणि २८ ऑगस्टच्या पुणे दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला. तानाजी सावंत यांचा दोन दिवसांचा कार्यक्रम जाहीर होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. सोशल मीडियातल्या चर्चेवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यानं त्याची माध्यमांनी दखल घेतली. तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान कात्रज ते बालाजीनगर आणि बालाजीनगर ते कात्रज अशा प्रकारचा उल्लेख होता. सोशल मीडियावरील चर्चेनंत तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अखेर स्वत: आरोग्यमंत्र्यांनी घडलेल्या सर्व प्रकारावर एक फेसबुक पोस्ट लिहून भूमिका मांडली आहे. 80% समाजकारण 20% राजकारण... दौरा देखील त्याच धरतीवर... दि. २७, २८ रोजी माझा वेळ पुणे येथील कार्यालयांमध्ये राखीव ठेवलेला असल्याकारणाने प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल निरनिराळी चर्चा पाहायला मिळाली.बालाजी नगर व कात्रज येथील कार्यालयातूनच आजवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्यात आला, याच कार्यालयातून पूरग्रस्तांसाठी भरभरून मदत पाठवण्यात आले. याच १०×१० च्या खोलीतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीचं रोपटं लावण्यात आलं आज त्याचं रूपांतर वटवृक्षात होतं आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. याच कार्यालयातून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला गेला, सोमनाथ नाईक च्या उपचारासाठी मदत झाली, याच कार्यालयातून स्व. दिलीप जावळे यांच्या कुटुंबाला मदत झाली, कोविड काळामध्ये देखील एकही दिवस घरामध्ये न बसता रोज नागरिकांसाठी मदत पोहचवली मग त्या मध्ये औषध इंजेक्शन पासून ते ऑक्सिजन सिलेंडर व ड्युरा सिलेंडर पर्यंत मदत देऊ केली... अशी कित्येक कामे या कार्यालयातून झाली आहेत, असं तानाजी सावंत यांनी सांगितलं. परमेश्वर कृपेने आजवर मी अनेकांच्या मदतीला पोहचू शकलो कारण घरातून कार्यालयाकडे गेल्यामुळेच, असं सावंत म्हणाले. यापुढे देखील आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अडलेल्या, नडलेल्या आणि अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या गरिबांच कल्याण होणार म्हणजे होणार आणि यासाठी ही कार्यालये मध्यवर्ती असतील, असं म्हटलं आहे. शेवटी सुरेश भट यांच्या शब्दातून हेच सांगेल, येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो आहे.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही .... असं तानाजी सावंत म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5fzeLtm

No comments:

Post a Comment