Breaking

Saturday, August 27, 2022

धक्कादायक! महिला रुग्ण रुग्णालयातील लिफ्टमध्ये अडकली, तीन तास मदत मिळालीच नाही https://ift.tt/9tfzT3b

मुंबई : घाटकोपर मधील झायनोव्हा या खासगी रुग्णालयात प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण लिफ्ट बंद पडून याच लिफ्ट मध्ये सुमारे तीन तास अडकून पडल्याची घटना आज घडली आहे. जयश्री जयसिंग सकपाळ असे या रुग्ण महिलेचे नाव आहे. जयश्री यांना त्यांची मुले वैभव आणि जितेंद्र हे घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेल्या झायनोव्हा रुग्णालयात डायलसीस करण्यासाठी आले होते. संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांनी रुग्णांसाठी असलेल्या लिफ्ट मधून रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लिफ्ट एक मजला वर गेली आणि बंद पडली. अशा प्रसंगी या रुग्णाला तासभर कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. (The for three hours in Zaynova, a private hospital in Ghatkopar) रुग्ण लिफ्टमध्ये अडकून पडल्यानंतर रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याने अखेर सकपाळ कुटुंबाने त्यांच्या जवळील नातेवाईकांना फोन केला आणि त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंत आणि तीन तासानंतर त्यांची सुटका झाली. क्लिक करा आणि वाचा- लिफ्ट अडकल्यानंतर जयश्री जयसिंग सकपाळ यांची मुलं वैभव आणि जितेंद्र यांनी रुग्णालयाकडे मदत मागितली. मात्र, त्यांना रुग्णालयाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. रुग्णालयाकडून मदत मिळत नसल्याने पाहून शेवटी या मुलांनी त्यांच्या जवळील नातेवाईकांना फोन केला आणि परिस्थिती कथन केली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांची सुटका केली. क्लिक करा आणि वाचा- सकपाळ यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिस आणि अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या रुग्णाची सुटका केली. घडलेल्या या प्रकारामुळे नातेवाईकांनी रुग्णालयाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6icdQXV

No comments:

Post a Comment