Breaking

Monday, August 29, 2022

मुकेश अंबानींकडून वारस घोषित; वाचा कोणाकडे सोपवण्यात आली मोठी जबाबदारी https://ift.tt/N7PcQnW

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सोमवारी आपले वारसदार घोषित केले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. आकाश, ईशा आणि अनंत या तिन्ही मुलांकडे स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले. त्याचवेळी अद्याप आपण निवृत्त झालेलो नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत ६५ वर्षीय मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामुळे रिलायन्स उद्योग एका विशाल कुटुंबाप्रमाणे एकत्र राहील, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. रिलायन्सचे तेल शुद्धीकरण व पेट्रोरसायने, रिटेल आणि डिजिटल सेवा हे मुख्य व्यवसाय आहेत. डिजिटल सेवा व्यवसायातच दूरसंचार सेवेचाही समावेश आहे. यापैकी रिटेल व्यवसायासाठी रिलायन्स रिटेल व्हेन्चर लिमिटेड तसेच दूरसंचार व्यवसायासाठी जिओ प्लॅटफॉर्म्स अशा दोन उपकंपन्या कार्यरत आहेत. आकाश अंबानी यांच्याकडे जिओची जबाबदारी देण्यात आली आहे. ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेलची जबाबदारी आहे. अनंत अंबानी यांच्याकडे ऊर्जा व्यवसाय देण्यात आला आहे. अनंत यांचे वास्तव्य जामनगर येथे ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी अधिक असते, असे मुकेश अंबानी म्हणाले. आकाश अंबानी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीचे ३० वर्षीय आकाश अंबानी हे अध्यक्ष आहेत. जिओ प्लॅटफॉर्म्सची ही उपकंपनी आहे. ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेन्चरच्या ईशा प्रमुख आहेत. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ, किराणा माल, फॅशन, ज्वेलरी, पादत्राणे, कपडे यांचे वितरण तसेच जिओमार्ट याची जबाबदारी त्या पेलत आहेत. ईशा यांचा विवाह अजय व स्वाती पिरामल यांचे पुत्र आनंद पिरामल यांच्याशी झाला आहे. अनंत अंबानी रिलायन्स समूहाच्या सौरऊर्जा, बॅटरी उत्पादन व हायड्रोजन ऊर्जा या व्यवसायांची जबाबदारी २६ वर्षीय अनंत अंबानी यांच्याकडे आहे. तिन्ही मुलांमध्ये बाबांचे (धीरुभाई अंबानी) गुण पूर्णपणे उतरले आहेत. हे तिघे युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्याचवेळी अनेक विस्मयकारक गोष्टीही रिलायन्समध्ये साकारत आहेत. या तिघांचे प्रशिक्षण मी व माझ्या संचालक मंडळातील सदस्य तसेच समूहातील वरिष्ठ यांच्याकडून प्रत्येक दिवशी सुरूच असते. - मुकेश अंबानी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qBKCzYh

No comments:

Post a Comment