: भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात तीन तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील अत्री गावात राहणारे हे तीन तरुण जिवलग मित्र होते. आज सायंकाळी गावातील बोडीमध्ये ( छोटा तलाव) आंघोळीसाठी गेले होते. उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांचा तलावाच्या परिसरात शोध घेतला असता या तीनही मुलांचे मृतदेह तलावात आढळून आले. (Three have drowned in a lake in district) प्रणय योगीराज मेश्राम, साहिल नरेश रामटेके, संकेत बालकदास रंगारी (सर्वांचे वय २० वर्ष) हे तिघे पवनी तालुक्यातील आत्री या गावातील रहिवासी आहेत. प्रणय, साहिल आणि संकेत हे जीवलग मित्र होते. ते एकत्र पोहण्यासाठी गेले होते. मात्र, ते नेहमी प्रमाणे घरी आले नाहीत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काळजी वाटली. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेही आढळले नाहीत. क्लिक करा आणि वाचा- अशी आली घटना उघडकीस शेवटी लोक त्यांना शोधत शोधत छोट्या तलावाजवळ गेले. तेथे मात्र लोकांना या तिघांच्या सायकली आणि कपडे दिसले. या सायकली आणि कपडे यांच मुलांच्या असल्याचे लोकांनी ओळखले. त्यानंतर तेथे शोध घेतल्यानंतर तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले. तिघांचाही मृत्यू झाल्याचे पाहून सर्वानाच धक्का बसला. क्लिक करा आणि वाचा- या तिघांचे मृतदेह तलावात आढळून आल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने हे तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंत तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. गावातील तीन जिवलग मित्र एकाच वेळेस मृत्यू पावल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YviJEqF
No comments:
Post a Comment