नवी दिल्ली : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आमने-सामने आले आहेत. राज्यातील शाळांच्या मुद्द्यांवरून अरविंद केजरीवालांनी भाजप मुख्यमंत्र्यांना सवाल केला. ईशान्य भारतातील शाळा चांगल्या नसतील तर आपण ती समस्या एकत्र येऊन सोडवू ,असं केजरीवाल म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. केजरीवालांनी शाळा बंद करून प्रश्न सोडवता येत नाही तर देशभरात आणखी शाळा सुरू केल्या पाहिजेत, असं म्हटलं. केजरीवालांनी त्यावेळी आसाममध्ये शाळा बंद होत असल्याची बातमी शेअर केली होती. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यावरुन अरविंद केजरीवाला प्रत्युत्तर दिला आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे जेव्हा मुद्दा नसतो त्यावेळेस दिल्लीची तुलना पूर्वोत्तर भारतातील राज्यांशी करतात, करतात असं सरमा म्हणाले. भाजपकडे सत्ता आल्यास दिल्ली जगातील सर्वात वैभवशाली शहर बनवू असं सरमा म्हणाले. तुम्ही दिल्लीला पॅरिस आणि लंडन सारखं शहर बनवण्याचं आश्वासन देत सत्तेवर आला होता, असं सरमा म्हणाले. केजरीवालांना आसामला भेट द्यायची आहे. मात्र, आसामच्या अडचणी, मोठ्या प्रमाणावरील नैसर्गित आपत्ती त्यामध्ये पूरस्थितीचा समावेश आहे, त्यामुळं तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. आज पुन्हा एकदा दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील वादाला सुरुवात झाली. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सरमा यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, असं ते म्हणाले. मी ज्यावेळी तुमच्या राज्यातील शाळा पाहायला येऊ त्यावेळी त्या चांगल्या स्थितीत नसतील तर त्यांची दुरुस्ती करण्यासाठी सोबत प्रयत्न करु, असं केजरीवाल म्हणाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि हिमांता बिस्वा सरमा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यांच्या राज्यातील सरकारी शाळा पाहण्यासाठी कधी येऊ असा सवाल केजरीवालांनी केला. मी कधी शाळा पाहण्यासाठी येऊ, असं केजरीवाल म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील त्यांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सरमा यांचं पक्षातील स्थान गेल्या काही दिवसांपासून बळकट होत आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांची व्यवस्था गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये करण्यात आली होती. तर, सरमा देखील काँग्रेस आणि बिगर भाजप शासीत राज्यातील राज्य सरकारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Xc6zApo
No comments:
Post a Comment