Breaking

Sunday, August 28, 2022

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची धुंवाधार बॅटिंग, मंत्री गुलाबराव पाटलांना थेट बोलले... https://ift.tt/y3YJGHs

: महाविकास आघाडीत असताना मंत्री (Gulabrao Patil) हे पाणीपुरवठा मंत्री होते. आताही त्यांना पाणीपुरवठा खातं मिळालं आहे. त्यांनी त्यांचं काम केलं आहे, आता माझ्याकडेही ग्रामविकास खातं आहे, त्यामुळे आता माझी पाळी आहे, असे म्हणत गुलाबभाऊ तुम्ही अडीच वर्षे वाया घालवली, पण देर आये दुरुस्त आये, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री (Girish Mahajan) यांनी केलं आहे. तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांचे आणि माझ्यामध्ये चांगला समन्वय आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले. Rural Development Minister said that Minister and I have good coordination 'आमच्याकडे आहे अडीच वर्षांचा काळ' भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. पाणीपुरवठा योजना मंजूर करुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे काम केले आहे. आता माझ्याकडे आता ग्रामविकास खात आहे, त्यामुळे गावात रस्ते करा, गटारी करा, शौचालये करा, घरकुले सर्वांना द्या, यासाठी प्रस्ताव लवकर लवकर द्या. कारण आमच्याकडे अडीच वर्षांचा काळ आहे, या काळात मी मंजूर करुन विकासकामे करता येईल असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. हे सांगत असतांनाच व्यासपीठावर उपस्थित मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बोट दाखवून, 'गुलाबभाऊ, तुम्ही अडीच वर्षे वाया घालवली. पण देर आये दुरुस्त आये, काही हरकत नाही. एकाच ठिकाणी दोन मंत्री असले की कसे चालते हे सर्वांना माहिती आहे. पण आमच्यामध्ये चांगला समन्वय आहे. याचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुध्दा यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शिवसेना वाचविण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केले- गुलाबराव पाटील दरम्यान, जळगावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दसरा मेळाव्यावरून भास्कर जाधवांनी शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून राजकीय अधिकारात कोणी हात टाकल्यास त्याचा राजकीय प्रवास भस्मसात होईल असा थेट इशारा शिंदे गटाला दिला होता. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना कोणाची आहे यापेक्षा शिवसेना वाचवली कोणी हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि शिवसेना वाचवण्यासाठी सर्वात मोठे काम कोणी केले असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lDXIpVb

No comments:

Post a Comment