Breaking

Sunday, August 21, 2022

उल्हासनगरात खळबळ; पोलिसांच्या व्हॅनमध्येच अटकेतील गुंडाने वाढदिवस साजरा केला https://ift.tt/pBeXU01

: एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगरमधील गुंडाने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून केक कापत वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. केक कापतानाचा त्याचा व्हिडीओ त्याच्याच समर्थकांनी आपल्या व्हॉट्सऍप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (the arrested criminal celebrated his birthday in a police van in ) रोशन झा हा उल्हासनगरमधील गुंड असून त्याच्यावर ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकावणे आणि इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी या गुंडाला कारागृहातून कल्याण न्यायालयात आणण्यात आलं होतं. तो पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेला असताना त्याच्या समर्थकांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणला. क्लिक करा आणि वाचा- गुंड रोशन झा याने पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून हातात हातकडी असतानाही खिडकीतून हात बाहेर काढून हा केक कापला. यावेळी व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांनी त्याला कोणताही मज्जाव केला नाही. केक कापतानाचा हा व्हिडिओ या गुंडाच्या समर्थकांनी व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आणि मोठी खळबळ उडाली. क्लिक करा आणि वाचा- अटकेत असलेल्या या गुंडाला कारागहातून सुनावणीसाठी न्यायालयात नेले जात होते. या दरम्यान या गुंडाच्या समर्थकांनी त्याच्यासाठी केक आणला होता. तो केक त्यांनी पोलीस व्हॅनमधून या गुंडाने हातकडी हाताला असतानाही कापण्यासाठी दिला आणि त्या गुंडाने तो केक कापलाही. हे आक्षेपार्ह असून पोलिसांनी अशी परवानगी दिलीच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात आता संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZxNyPor

No comments:

Post a Comment