मुंबई : आशिया कपच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान येत्या रविवारी म्हणजेच २८ तारखेला एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत असलेली लढाई फक्त दोन देशांपुरतीच नव्हे तर जगभरासाठी उत्कंठावर्धक असते. सामन्याला जरी आणखी आठवडाभर वेळ असला तरी दोन्ही संघांवरील टीकाटिप्पणी आतापासूनच सुरु झाली आहे. दुखापतीने खेळू शकणार नाही हा भारतीय संघासाठी मोठा दिलासा आहे, असं म्हणत पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनिसने भारतीय संघाला डिवचलं होतं. त्याला भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने देखील तोडीस तोड उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचं आक्रमण सांभाळणारा शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक २०२२ मधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही तो खेळू शकणार नाही. शाहीन शाह आफ्रिदी खेळणार नाही हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. २०२० च्या टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. त्या सामन्यात शाहीन आफ्रिदी (३१/३) विजयाचा हिरो ठरला होता. त्यात आफ्रिदीला आता आशिया चषकातील सामन्याला मुकावे लागणार आहे. पाकिस्तान संघाला २८ ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध खेळायचे आहे. 'आफ्रिदी खेळणार नाही हा भारताला दिलासा' म्हणणाऱ्या वकार युनिसला इरफान पठाण यानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यावेळी आशिया कप खेळत नाहीत ही पाकिस्तान संघांसाठी दिलासादायक बातमी आहे, असं म्हणत इरफानने वकार युनिसला डिवचलं आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरनेही इरफानची बाजू घेऊन पाकिस्तानची खिल्ली उडवली. त्याने एक मीम ट्विट केलंय, ज्यामध्ये त्याने म्हटलंय, चाहे तुम कुछ ना कहो मैने सुन लिया... त्याच्या ट्विटखाली अनेकांनी रिप्लाय करत पाकिस्तानी संघाला ट्रोल केलंय. आशिया चषक-२०२२ मध्ये २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्याने पाकिस्तानी संघाला मोठा झटका बसलाय. पाकिस्तानच्या संघात शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी कोण येणार, हे कळू शकलेलं नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uZrLc0I
No comments:
Post a Comment