दापोली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी () यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स करत लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह कमेंट्स केल्याबद्दल दापोलीत उद्धव ठाकरे गटाचे युवा शहरप्रमुख प्रसाद रंजना रमण दरीपकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार भाजपचे दापोली शहराध्यक्ष संदीप सुधारकर केळकर यांनी दापोली पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकारानंतर दापोलीत खळबळ उडाली आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशाच एका दहीहंडी उत्सवाच्या पुण्यातील कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या बातमी संदर्भातील पोस्ट एका प्रसिद्ध दैनिकाच्या फेसबुकपेजवर अपलोड करण्यात आली होती. क्लिक करा आणि वाचा- फेसबूक पेजवर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियांच्या वेगवेगळ्या पोस्ट दिसून येत आहेत. यातील दापोली तालुक्यातील शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रसाद रंजना रमण दरीपकर या नावाने फेसबुक अकाउंट असलेल्या व्यक्तीने अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील, महिलांबद्दल सार्वजनिक लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वाक्य उच्चारून पोस्ट करण्यात आलेले आहे. ही प्रतिक्रिया आल्यानंतर खळबळ उडाली आहे. क्लिक करा आणि वाचा- मनात लाज उत्पन्न होऊन "विनयभंग होईल अशा पद्धतीची ही पोस्ट दिसून येत असल्याने या युवकावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे दापोली शहराध्यक्ष संदीप सुधारकर केळकर यांनी दापोली पोलीस स्थानकात केली आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IGDtFlT
No comments:
Post a Comment