Breaking

Sunday, August 21, 2022

DOLO 650 प्रकरणी नवी अपडेट, १००० कोटींच्या भेटवस्तूंवर कंपनीनं भलतंच सांगितलं https://ift.tt/M8amxuk

नवी दिल्ली: ताप आणि अंगदुखीपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'डोलो 650' या औषधाची जाहिरात करण्यासाठी डॉक्टरांना एक हजार कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप फार्मास्युटिकल कंपनी मायक्रो लॅब्सने फेटाळून लावला आहे. एका एनजीओने गुरुवारी (१८ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने बेंगळुरुस्थित एका फार्मास्युटिकल कंपनीवर रूग्णांशी सल्लामसलत करून औषध लिहून देण्यासाठी डॉक्टरांना १,००० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा आरोप केला आहे. मायक्रो लॅब्सच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, काही मीडिया रिपोर्ट्सने बिनबुडाचे आरोप केले आहेत की कंपनीने 'डोलो 650' ची जाहिरात करण्यासाठी एका वर्षात १००० कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू वितरीत केल्या आहेत. प्रवक्त्याने सांगितले की हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे आणि मायक्रो लॅब, फार्मास्युटिकल उद्योग आणि डॉक्टरांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा आहे. हेही वाचा - 'डोलो 650' ची वार्षिक विक्री ३६० कोटी रुपये झाली आहे, जी कंपनीच्या एकूण विक्रीच्या आठ टक्के आहे. प्रवक्त्याने सांगितले की, 'डोलो 650' सारख्या परवडणाऱ्या पर्यायांसह, देशभरातील डॉक्टर महागड्या अँटीव्हायरल आणि इतर औषधांचा अवलंब न करता त्यांच्या बहुतेक रुग्णांना साथीच्या आजारात बरे करण्यास सक्षम ठरले आहेत. हेही वाचा - एक हजार कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू वाटपाची चर्चा उपहासात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं. "कंपनी हे स्पष्ट करु इच्छिते की ज्या रकमेबाबत चर्चा होत आहे, ती मागील पाच वर्षांत कंपनीच्या संपूर्ण भारतातील व्यवसायाच्या एकूण विक्री आणि विपणन खर्चाशी संबंधित आहे". डॉक्टरांनी हे औषध त्याची गुणवत्ता, तापातून झटपट आराम आणि तीन दशकांहून अधिक काळ निर्माण झालेला विश्वास या आधारावर लिहून दिलं आहे. हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ozhfcsk

No comments:

Post a Comment