Breaking

Friday, August 26, 2022

घराबाहेर पडण्याआधीच लोकलचं वेळापत्रक पाहा, कुठे आणि कधीपर्यंत असणार मेगाब्लॉक https://ift.tt/sjJ4ADR

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार उद्या असल्याने खरेदीसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य (मुख्य मार्ग) आणि पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनभट्टी/वांद्रे मार्गावर आणि ठाणे ते वाशी/नेरूळ या ट्रान्स हार्बरवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वे स्थानक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० मार्ग : अप आणि डाऊन परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल मार्गावर अप आणि डाऊन मार्गवरील लोकल फेऱ्या रद्द राहतील. पनवेल आणि कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान मुख्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ट्रान्सहार्बर स्थानक : ठाणे ते वाशी/नेरुळ वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० मार्ग : अप आणि डाऊन परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी आणि नेरुळदरम्यान लोकल फेऱ्या रद्द राहतील. प्रवाशांनी खरेदीसाठी बाहेर पडताना ब्लॉकची वेळ लक्षात घेऊन प्रवास करावा.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4gE6NVB

No comments:

Post a Comment