Breaking

Saturday, August 27, 2022

तू माझ्या सोबत...; डोक्यात राग गेलेल्या पतीने पत्नीशी केले धक्कादायक कृत्य, सासरच्या मंडळींनाही सोडले नाही https://ift.tt/SZcWLve

इंदापूर : 'तू माझ्या सोबत नांदायला का येत नाही ?, तुला आता जिवंत ठेवत नाही', असं म्हणत पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून सासुरवाडीच्या मंडळींवर हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे घडली. याप्रकरणी शुभम शिवाजी शेलार (वय २३ वर्षे, राहणार- पळसदेव, ता. इंदापुर जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून जनार्धन गोविंद गाडे (राहणार- न्हावरा गुनाट, वाहिर, जि.पुणे) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (the husband made a fatal attack on his wife and his in-laws) पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२६ रोजी आरोपी जनार्दन गाडे हा रात्री नऊच्या वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शुभम शेलार यांच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील घरी आला. त्याने पत्नीला शिवीगाळ करत, तू माझ्या सोबत नांदायला का येत नाहीस ? तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणत कोयत्याने पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर वार केला असता फिर्यादी हा बहिणीस सोडविण्यासाठी गेला. दरम्यान, आरोपी जनार्दन गाडे याने पत्नीच्या उजव्या हाताचे मनगटावर वार केल्याने ती ही खाली कोसळली. फिर्यादीने आरोपी जनार्दन गाडे याचे हातातून कोयता घेत असताना गाडे याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजावर, बोटांवर तसेच उजव्या हाताच्या पोटरीवर वार करुन फिर्यादीला गंभीर जखमी केले. तो रक्तबंबाळ झाल्याने फिर्यादीचे वडील हे मुलाला सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने त्यांच्याही डाव्या हाताच्या तळव्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर व बोटांच्या मध्ये वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. त्यांना लाथांनी मारहाण केली. दरम्यान, फिर्यादीची आई पतीला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांच्याही पाठीत कोयता उलटा मारुन त्यांना ही दुखापत केली आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर जनार्दन गाडे याने सासरच्या सर्वांना, तुम्ही सर्वजण आता माझ्या तावडीतून वाचला आहात. परंतु, पुढे माझ्या तावडीतून वाचणार नाही, अशी धमकी देऊन तो पळून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iL5GREI

No comments:

Post a Comment