: लातूरमधील गांधी चौकाकडून विवेकानंद चौकाकडे भरधाव निघालेल्या जीपचालकाने दोन शाळकरी मुलांसह एका दुध विक्रेत्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना सम्राट चौकात घडली आहे. यात एका १५ वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. तर इतर दोघे शाळकरी मुले गंभीर जखमी झाले आहेत. निष्काळजीने वाहन चालविणाऱ्या चालकाने रस्त्यावरील अनेकांना धडक देऊन पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात निरागस विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने लातूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. (A school student has lost his life while two others have been seriously injured in a ) लातूर शहरातील गौसपुरा भागात राहणारा अरसलान गफार शेख (वय १५) हा ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता ९ वी मध्ये शिकत होता. दरम्यान, तो रविवारी आपल्या मित्रासोबत खासगी शिकवणीला निघाला होता. गांधी चौकाकडून भरधाव आलेल्या जीप चालकाने सम्राट चौकात आल्यानंतर एका दूध विक्रेत्यासह दोन शाळकरी मूलांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, अरसलान शेख व त्याचा मित्र रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी अरसलान शेख याला मृत घोषित केले. तर सोबतचा शाळकरी मुलगा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- शिवाय, या अपघातात जखमी झालेल्या दूध विक्रेत्याचा पाय जायबंदी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे लातूर शहरात संताप देखील व्यक्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DZJR0XL
No comments:
Post a Comment