नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आता आनंदाची बातमी आली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक यांचा करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आता ते संघात कधी दाखल होणार, याबाबतची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ युएईला निघण्यापूर्वी द्रविड यांची करोना चाचणी घेण्यात आली होती, या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे द्रविड यांना भारतीय संघाबरोबर युएईला जाता आले नव्हते. त्यामुळे द्रविड आशिया चषकासाठी भारतीय संघाबरोबर असणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. द्रविड यांचाया अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे भारतीय संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले होते. पण आता द्रविड यांची करोना चाचणी घेण्यात आली आणि या चाचणीचा अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. द्रविड भारतीय संघात कधी दाखल होणार, जाणून घ्या...द्रविड करोनामधून आता पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे आता द्रविड हे संघाबरोबर राहू शकतात. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी द्रविड हे युएईला रवाना होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते भारताचे प्रशिक्षकपद भूषवणार आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी ही आनंदाची बातमी आली आहे. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने एकामागून एक स्पर्धा आणि मालिका जिंकल्या होत्या. त्यामुळे आशिया चषकासाठी द्रविड हे संघाबरोबर असायला हवेत, असे खेळाडूंबरोबरच चाहत्यांनाही वाटत होते. पण करोनाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आणि त्यांना बंगळुरु येथील घरामध्ये विलगीकरणात ठेवावे लागले होते. पण आता द्रविड यांची करोना चाचणी घेण्यात आली, या करोना चाचणीचा अहवाल आता निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना लवकर युएईला पाठवण्यासाठी बीसीसीआय तयारी करत आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार द्रविड हे रविवारी भारतीय संघात पाकिस्तानविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी दाखल होतील. त्यामुळे भारतीय संघाची चिंता आता मिटणार आहे. पण द्रविड संघात आल्यावर लक्ष्मण यांच्याकडे आता कोणती जबाबदारी असणार, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. द्रविड संघात दाखल झाल्यावर लक्ष्मण यांना एकतर संघाबरोबर ठेवले जाऊ शकते, कारण त्यांनी भारतीय संघाबरोबर काही काळ व्यतित केला आहे. भारतीय संघाच्या सरावातही ते सामील होते. दुसरी गोष्ट म्हणजे द्रविड संघात दाखल झाल्यावर लक्ष्मण यांना मायदेशी पाठवले जाऊ शकते. पण या दोन्ही शक्यतांचा विचार केला तर लक्ष्मण यांना भारतीय संघाबरोबर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. (याबाबतचे पहिले वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तवाहिनेने दिले होते)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/j1IhEMo
No comments:
Post a Comment