: मागील वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने शेतामध्ये पेरलेले सोयाबीन सुकून गेले. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत असलेल्या एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले आहे. ही हृदयद्रावक घटना परभणी तालुक्यातील पान्हेर गावामध्ये घडली आहे. विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याला उपचारासाठी परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्रंबक लक्ष्मणराव घुले वय पन्नास वर्षे असे विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (A in took poison as the soybean crop dried up) परभणी तालुक्यातील पान्हेर येथील शेतकरी त्र्यंबक लक्ष्मणराव घुले यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. परभणी जिल्ह्यामध्ये मागील वीस दिवसापासून पावसाने उघडीप दिली असल्याने पिके सुकायला सुरू झाली आहेत. अशातच शेतातील सोयाबीन सुकत असल्याने बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या शेतकरी त्रंबक लक्ष्मणराव घुले यांनी आज शनिवार ३ सप्टेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. क्लिक करा आणि वाचा- त्रंबक घुले यांनी विषारी औषध प्राशन केल्याची बाब त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्र्यंबक घुले यांना उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या स्थितीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान मागील २० दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली असल्याने सोयाबीन कापूस पिके धोक्यात आली आहेत. आणखी दोन दिवस पाऊस नाही पडला तर संपूर्ण पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OtSk9il
No comments:
Post a Comment