नवी दिल्ली : ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (AIIO) प्रमुख इमाम डॉ. उमर अहमद इलियासी यांना () मोहन भागवत यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर डॉ. इलियासी यांनी यांना 'राष्ट्रपिता' असे संबोधले होते. मात्र, यामुळे त्यांना आता धमक्या मिळू लागल्या आहेत. तुमचे डोके धडापासून वेगळे करू, अशी धमकीच त्यांना देण्यात आली आहे. अशी धमकी देणारे फोन इंग्लंडमधूनही येत असल्याची माहिती मिळत आहे. जिथे अलीकडे मंदिरे आणि हिंदूंना अतिरेक्यांनी लक्ष्य केले आहे. (dr umer ahmed ilyasi has received threats) केवळ इंग्लंडमधूनच नव्हे, तर त्यांना एका आठवड्यात पाकिस्तानसह देशाच्या अनेक भागातून धमक्यांचे शेकडो फोन आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून त्यांनी त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. याप्रकरणी टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'धमक्यांपुढे झुकणार नाही' मात्र, आपण या धमक्यांपुढे झुकणार नसल्याचे डॉ. इलियासी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. देशात सद्भावना वाढवण्याचे काम आपण सुरूच ठेवणार असून सरसंघचालकांबाबत केलेले वक्तव्य आपण मागे घेणार नाही, असेही ते म्हणाले. २२ सप्टेंबर रोजी मोहन भागवत, सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल आणि ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी डॉ. इलियासी यांची कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत भेट घेतली होती. येथे इमामांचे कुटुंबही राहत होते. परदेशातून धमक्या येत आहेत डॉ. इलियास यांनी मोहन भागवत यांच्याबाबत केलेले विधान राजकारणातील एका वर्गाला आणि कट्टरवाद्यांना पसंत पडलेले नसल्याचे दिसत आहे. इलियासी यांनी सांगितले की, या भेटीनंतरच त्याच्या मोबाईल फोन नंबरवर वेगवेगळ्या देशांतून आणि देशाच्या काही भागांतून धमकीचे फोन येत आहेत. या संदर्भात त्यांनी ४ सप्टेंबर रोजी टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून गृह सचिव आणि दिल्ली पोलिस आयुक्तांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे. पीएफआयवरील बंदीला पाठिंबा देऊनही ते कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/eET5BWa
No comments:
Post a Comment