मुंबई : राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्याचं सांगितलं जातं. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह अनेक वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे तर ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून राजेश शिंगारे यांची नियुक्ती झाली आहे. ठाण्याच्या महापालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाली आहे. अभिडीत बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून ओळखले जातात. मर्जीतला अधिकारी ठाण्यात, संजय राऊतांचे व्याही नवी मुंबईत नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजीत बागंर यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून देखील अभिजीत बांगर यांची ओळख आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची ही मोठी खेळी मानली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र देखील सुरु आहे. आज राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. मनीष पाटणकर म्हैसकर यांची पर्यावरणीय आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना मुख्य राजशिष्टाचार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन बदली करुन त्यांना नागरी उड्डाण, मान्य प्रशासन विभाग, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई च्या सचिव पदावरुन राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/A6JuW4G
No comments:
Post a Comment