Breaking

Sunday, September 4, 2022

रोहितच्या फक्त २ षटकारने झाले मोठे विक्रम; एकाच वेळी दोघा दिग्गजांना मागे टाकले https://ift.tt/aWmyklE

दुबई: आशिया कप सुपर ४ मध्ये भारताची लढत पाकिस्तानविरुद्ध सुरू आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर १८१ धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी सलामीवीर आणि केएल राहुल यांनी भारताला धमाकेदार सुरूवात करून दिली होती. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध धमाकेदार सुरूवात केली. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये षटकार आणि चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केला. अर्थात रोहितला आज देखील मोठी खेळी करता आली नाही. १६ चेंडूत २८ धावाकरून तो बाद झाला. त्याने १७५च्या स्ट्राइक रेटने २ षटकार आणि ३ चौकार मारले. वाचा- रोहित शर्माच्या या खेळीत दोन मोठे विक्रम त्याच्या नावावर झाले आहेत. पाकिस्तानविरुद्ध मारलेल्या त्या दोन षटकारामुळे रोहितने आशिया कपच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. कर्णधार म्हणून आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार रोहित शर्मा -१८ षटकार धोनी- १६ षटकार वाचा- सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने श्रीलंकेच्या जयसूर्याला मागे टाकले. जयसूर्याने २३ षटकार मारले आहेत, आता रोहितच्या नावावर २५ षटकार झालेत. या यादीत शाहिद आफ्रिदी अव्वल स्थानावर आहे. आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज शाहीद आफ्रिदी- २६ षटकार रोहित शर्मा- २५ षटकार जयसूर्या- २३ षटकार सुरेश रैना- १८ षटकार धोनी- १६ षटकार


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9PyLF1g

No comments:

Post a Comment