मुंबई: शापुरजी पालनजी उद्योगसमूहाचे वारसदार आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष शापुरजी पालनजी यांचा रविवारी पालघरनजीक झालेल्या भीषण कार अपघातामध्ये मृत्यू झाला. येथील सूर्या नदीवरील पूलावरील दुभाजकावर त्यांची मर्सिडीज कार जोरात आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या बोनेटचा अर्धा भाग चक्काचुर झाला आहे. एवढेच नव्हे तर मर्सिडीज कारचे इंजिन हे थेट चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या पायापर्यंत आले होते. इंजिन धडकेने इतक्या आतवर घुसले यावरुन ही धडक किती जोरदार असेल, याचा अंदाज येऊ शकतो. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील सूर्या नदीच्या पुलावर साधारणतः दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मर्सिडीज गाडीचा (MH 47 AB 6705) दुभाजकाला आदळून भीषण अपघात घडला. या अपघातात यांच्यासह जहांगीर दिनशा पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर या गाडीची चालक महिला अनहिता पंडोले आणि डेरियस पंडोले हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोघांना सुरुवातीला कासा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले .मात्र त्यांना पुढील उपचारासाठी गुजरात मधील वापी येथील रॅम्बो रुग्णालयात हलविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितला अपघाताचा थरारक प्रसंग चारोटी गावाच्या परिसरातील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने हा अपघात कसा घडला, याबद्दल माहिती दिली. सायरस मिस्त्री यांची कार एक महिला चालवत होती. ही कार डाव्या बाजुने अन्य एका कारला ओव्हरटेक करत होती. याचवेळी पुलावर असणाऱ्या दुभाजकाला ही कार धडकली. अपघात घडल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सायरस मिस्त्री यांची कार कोण चालवतं होतं? हा अपघात झाला तेव्हा अनहिता पंडोले या सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार चालवत होत्या. अनहिता पंडोले या मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अपघातानंतर कारमधील एअर बॅग्ज उघडल्यामुळे अनहिता पंडोले (५५) आणि त्यांच्या बाजूला बसलेले डेरियस पंडोले (६०) बचावले. मात्र, या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WseJ1Of
No comments:
Post a Comment