Breaking

Wednesday, September 21, 2022

बाप रे! १० फूट लांबी, ६० दात, तोंडात विष; अस्वल, म्हशी खाणाऱ्या महाकाय भयंकर पाली पाहिल्या का? https://ift.tt/cCR3MTq

नवी दिल्ली : चित्त्याच्या वेगाबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. मात्र, आपण बोलणार आहोत अशा महाकाय पालीबाबत (), जी ताशी १२ मैल इतक्या वेगाने धावू शकते. भिंतीवर चालणारी (Giant Lizard) इतकी वेगवान कशी होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आपण ज्या पालीबाबत बोलत आहोत, तिचे छायाचित्र पाहून तुम्हाला वाटेल की ती एखाद्या मगरीपेक्षा कमी नाही. होय, तुम्ही तिला पाल मानायला तयार नसाल. तिचे नाव आहे. ही प्रामुख्याने इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर आढळते. हिला पृथ्वीवरील सर्वात मोठी पाल असे देखील म्हणतात. हिची लांबी १० फूट इतकी आहे. ( that has 60 teeth in its mouth and eats bears and buffaloes) तोंडात विषारी जीवाणू ही पाल पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात सापडली. या पालीच्या करण्यात आलेल्या अभ्यासानुसार असे दिसते की ही पाल तब्बल ५० हजार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातून गायब झाली. या महाकाय पालीच्या तोंडात धोकादायक बॅक्टेरिया आढळून आल्याने ती ज्याला चावते त्याचा मृत्यू निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. या विषारी पाली त्यांच्या मोठ्यातले मोठी शिकार देखील करू शकतात. ही इतकी भयानक असते की, एखादा प्राणी एकदा का हिच्या तोंडात फसला आणि जरी तो जीव वाचवून पळून गेला तरी विषामुळे त्याचा मृत्यू होणार हे नक्की. अशा परिस्थितीत, ही पाल वास घेत जखमी शिकारीजवळ पोहोचतो. आपली शिकार आता फार दूर पळू शकणार नाही हे तिला पक्के ठाऊक असते. अस्वल आणि म्हशी देखील बनतात खाद्य या महाकाय पाली अस्वल आणि म्हशींना देखील मारू शकतात. काही हत्ती नामशेष झाले आहेत.या हत्तांना कोमोडो ड्रॅगननेच नष्ट केले आहे असे म्हणतात. त्यांची शिकार करण्याची पद्धतही वेगळी आहे. त्या लपून थांबतात, प्राणी जवळ येताच त्या विषारी तोंड उघडतात आणि लपून बसतात. त्यांना ६० दात आहेत. जेवणानंतर घेतात सूर्यस्नान त्यांच्या त्वचेखाली हजारो लहान हाडे असतात. अशा परिस्थितीत त्यांचे शरीर स्वतःच ढाल म्हणून काम करते. ते त्यांच्या वजनाच्या ८० टक्के मांस एकाच वेळी खाऊ शकतात. त्यांची पचनक्रिया मंद असते. अशा परिस्थितीत, मोठ्या शिकारीची शिकार केल्यानंतर, ते पचण्यासाठी सूर्यस्नान करतात. एकदा खाल्ले की ते महिनाभर टिकते. या पाली इतक्या मोठ्या शिकारी आहेत की त्या सहा मैल दूरवरून वास घेऊ शकतात आणि जमिनीवर चालताना पुरलेले मृतदेह देखील सोडत नाहीत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CcMuE14

No comments:

Post a Comment