Breaking

Wednesday, September 21, 2022

दे दणादण... सामना एक विक्रम अनेक, भारतीय खेळाडूंचा इंग्लंडवर सर्जिकल स्ट्राइक https://ift.tt/GQCrcAp

कँटबरी : भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आजच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात हरमनप्रीतने बरेच विक्रम मोडीत काढले आहेत. हरमनप्रीतने या सामन्यात १११ चेंडूंत अठरा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद १४३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. तिला स्मृती आणि हरलीन यांनी अर्धशतक झळकावत चांगली साथ दिला. हरमनप्रीतने या सामन्यात फक्त २२ चेंडूंत ९२ धावा चौकार आणि षटकारांच्या जोरावर फटकावल्या. जाणून घ्या या सामन्यातील विक्रम....स्मृतीच्या वेगवान तीन हजार धावा... इंग्लंडविरुद्ध स्मृती मानधनाने ४० धावांची खेळी केली. यासह स्मृती महिला वनडेमध्ये सर्वांत वेगवान तीन हजार धावांचा टप्पा पार करणारी भारताची फलंदाज ठरली. तिने ७६ डावांत हा टप्पा पार केला. याबाबतीत तिने मिताली राजला मागे टाकले. मितालीने ८८ डावांत तीन हजार धावांचा टप्पा पार केला होता. स्मृती मानधनाने ७६ वनडेंमध्ये ४३.१८च्या सरासरीने ३०२३ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे. स्मृतीपूर्वी मिताली राज (७८०५) आणि हरमनप्रीत (३३१८) या भारतीय महिलांनी वनडेत तीन हजारहून अधिक धावा केल्या आहेत. पुरुषांच्या वनडेमध्ये भारताकडून शिखर धवनने ७२ डावांत, तर विराट कोहलीने ७५ डावांत तीन हजार धावांचा टप्पा पार केला होता. शतक झळकावण्याचा पराक्रमसेंट लॉरेन्स मैदानावर (कँटेबरी) इंग्लंड महिला संघाविरुद्ध शतक करण्याचा पराक्रम हरमनने केला. याआधी ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन हिल यांनी १९७५मध्ये अशी कामगिरी केली होती. परदेशातील वनडे पाचशे प्लस धावा करणाऱ्या भारतीय महिला- मिताली राज न्यूझीलंडमध्ये, मिताली राज इंग्लंडमध्ये, हरमनप्रीत इंग्लंडमध्ये. एकाच डावात तिनशे धावा... इंग्लंडविरुद्ध भारतीय महिला संघाने प्रथमच वनडेत तीनशेहून अधिक धावा केल्या. यापूर्वी, भारतीय महिलांनी वनडेंत आयर्लंड (२ बाद ३५८), वेस्ट इंडिज (८ बाद ३१७) आणि दक्षिण आफ्रिका (३ बाद ३०२) या संघांविरुद्ध तीनशेहून अधिक धावा केल्या आहेत. हरमनप्रीतचे पाचवे शतक हरमनप्रीतने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धचे हरमनप्रीतचे हे दुसरे शतक ठरले. यापूर्वी, तिने २०१३मध्ये ‘ब्रेबर्न’ला इंग्लंडविरुद्ध नाबाद १०७ धावा केल्या होत्या. या वेळी तिने नाबाद १४३ धावा केल्या. भारतीय महिलांचा ३००वा सामनाभारतीय महिला संघाचा हा तिनशेवा वनडे सामना ठरला. पहिलीच आशिया कर्णधारइंग्लंडच्या महिला संघाविरुद्ध वनडे शतक झळकावणारी हरमन ही पहिलीच आशियाई महिला कर्णधार ठरली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BZmVc9S

No comments:

Post a Comment