दुबई : श्रीलंकेच्या संघाने तब्बल आठ वर्षांनी जेतेपदाला गवसणी घातली. पण हा विजय त्यांच्यासाठी सोपा नव्हता. या सामन्यात त्यांनी बराच संघर्ष केला. भानुका राजपक्षाने झुंजार अर्धशतक झळकावले आणि त्यामुळेच त्यांना १७० धावा करता आल्या, पण तरीही सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकला नव्हता. पण या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने एक माइंड गेम खेळला आणि तोच या सामन्याचा टर्निंद पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानची सुरुवात चांगली नाही. बाबर आझमने यावेळी अर्धशतक झळकावले आणि पाकिस्तानचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण त्याचवेळी श्रीलंकेच्या संघाने एक चाल खेळली आणि तीच यशस्वी ठरली. कारण या एका गोष्टीमुळे फायनलचा सामना हा श्रीलंकेच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती १७व्या षटकात. त्यावेळी बाबर आझम हा चांगल्या फॉर्मात दिसत होता. त्यावेळी श्रीलंकेच्या कर्णधाराने चेंडू वानिंडू हसरंगाच्या हातामध्ये दिला. हसरंगाने यावेळी मोहम्मद रिझवानला पहिल्याच चेंडूवर बाद केले आणि त्यांनी पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कारण बाबर हा श्रीलंकेच्या विजयातील मोठा अडसर ठरत होता. हसरंगा फक्त एवढ्यावर थांबला नाही तर त्याने तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीला बाद केले आणि पाकिस्तानला अजून एक धक्का दिला. त्यानंतर या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खुशदिल शाहला बाद केले आणि एकाच षटकात त्याने तीन विकेट्स घेतले आणि हे एकच षटक श्रीलंकेसाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेने कसा साकारला या सामन्यात विजय, जाणून घ्या...श्रीलंकेने भामुका राजपक्षाच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर १७१ धावांचे आवव्हान पाकिस्तानला दिले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानच्या धावसंख्येला यावेळी खीळ बसवता आली. पाकिस्तानचा बाबर आझम हा श्रीलंकेच्या विजयाच्या मार्गात अडसर बनू पाहत होता.त्याने ५५ धावांची खेळीही साकारली. पण श्रीलंकेच्या डीसिल्व्हाने त्याला बाद केले आणि त्यांना मोठे यश मिळाले. कारण श्रीलंकेने या सामन्यात २३ धावांनी अटीतटीच्या सामन्यात विजय साकारला. श्रीलंकेसाठी हा एक मोठा विजय ठरला. कारण यजमान असूनही त्यांना या स्पर्धेचे आयोजन करता आले नव्हते. त्याचबरोबर या विजयाचा मोठा परीणाम त्यांच्या संघावर होईल आणि याचा फायदा त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे आता श्रीलंकेचा संघ विश्वचचषकात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DRoaSU3
No comments:
Post a Comment