ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ठाण्यातील मनोरमा नगर येथे वाचनालय होते. या वाचनालयावर ‘शिवगर्जना प्रतिष्ठान आनंद आश्रम सार्वजनिक मोफत वाचनालय’ असा बॅनर लावण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून शिवसेनेकडून लावलेला बॅनर काढून त्या ठिकाणी ‘शिवसेना शाखा आनंद आश्रम वाचनालय’ असा बॅनर लावला. यालाच विरोध करत आक्रमक झालेल्या ठाकरे गटाकडून आंदोलन करुन हा बॅनर उतरवला. यावेळी शिंदे गट आणि शिवसेना खासदार राजन विचारे यांच्यासह शिवसैनिक आमनेसामने आले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाची समजूत काढली त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारलं सेनेच्या ४० आमदारांच्या मदतीने भाजप सोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांच्या या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरु झाला. मात्र, वाचनालयाच्या बॅनरवरून आज पुन्हा एकदा ठाण्यातील मनोरमा नगर येथे वाद उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाण्यातील मनोरमा नगर येथे गेल्या १५ वर्षांपासून धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने मोफत वाचनालय सुरु होते. असलेला ‘शिवगर्जना प्रतिष्ठान आनंद आश्रम सार्वजनिक मोफत वाचनालय’ असा बॅनर शिवसेनेकडून या वाचनालयावर लावला होता. वाचनालयावरील बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो होता. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने या वाचनालयावर ताबा घेऊन वाचनालयाची रूपरेषा बदलल्याचा आरोप करत ठाकरे गटाने या वाचनालयावर आज हल्लाबोल केला. या वाचनालयावर शिंदे गटाकडून जुना बॅनर काढून ‘शिवसेना शाखा, आनंद आश्रम वाचनालय’ असा बॅनर लगावण्यात आला. या बॅनरवर धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे मोठे फोटो आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छोटा लावण्यात आला आहे. तसेच या वाचनालयाच्या आत एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो आणि उद्धव ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लहान करून लावण्यात आला आहे. हे सर्व पाहून शिवसैनिक आक्रमक झाले झाले. त्यानंतर राजन विचारे यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांनी शिंदे गटाने लावलेला हा शिवसेना शाखेचा बॅनर खाली उतरवत पुन्हा जुना बॅनर लावला. पोलिसांनी मध्यस्ती करून शिवसैनिकांची समजूत काढून या ठिकाणी वाचनालय होते आणि वाचानालायचं राहील आणि ठाकरे गटाकडून लावलेला बॅनर कुणीही काढणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. राजन विचारे निघून गेल्यानंतर पुन्हा बॅनर लावला शिवसेनेचे खासदार राजन विचारे हे मनोरमानगरमध्ये गेल्यानंतर वाचनालयावर शिंदे गटाचा बॅनर काढून जुना बॅनर लावण्यात आला. बॅनरचा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी कापूरबावडी पोलिसांनी मध्यस्थी करत राजन विचारे यांना कुणीही बॅनर काढणार नसल्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्यानंतर खासदार राजन विचारे आणि शिवसैनिक हे निघून गेल्यानंतर घटनास्थळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के पोहचले आणि त्यांनी पुन्हा शिंदे गटाचा बॅनर लावला. मात्र, पोलिसांनी जुना बॅनर जमा केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YjW5fUA
No comments:
Post a Comment