Breaking

Tuesday, September 20, 2022

शाळेत जेवण केल्यानंतर ५० विद्यार्थ्यांच्या अचानक पोटात दुखू लागले, ५ विद्यार्थी गंभीर https://ift.tt/sE4v3BN

: वांग्याची भाजी खाल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. किनवट तालुक्यातील जलधरा या गावातील आश्रम शाळेत मंगळवारी सकाळी ही घटना घडली. विषबाधा झालेल्या ५० विद्यार्थ्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. या जेवणात वांग्याची भाजी होती. जेवण झाल्यानंतर काही वेळात अनेक विद्यार्थ्यांच्या पोटात दुखाण्यास सुरुवात झाली. पोटात दुखत असल्याने ५० विद्यार्थ्यांना तातडीने हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (In Nanded, 50 , out of which 5 students are in critical condition) ५० पैकी ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने या विद्यार्थ्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. काजल तांबारे, सरिता पिंपळे, पूजा ढोले ,जयश्री डूडुळे, दिव्या ढोले, चांदणी मेंडके ,वैष्णवी मिराशे, वंदना डुकरे, संध्या शेळके, ओमसाई ढाले , दिव्या मेंडके यासह इतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत असल्याने शाळेतील शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती पालकांना मिळाल्यानंतर पालकांनी आश्रम शाळेत मोठी गर्दी केली होती. आश्रम शाळेत अंदाजे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजताच्या दरम्यान जेवण केले. जेवण केल्यानंतर काही वेळात शाळेतील ५० विद्यार्थ्यांना पोटात दुखत असल्याने विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड आणि डॉ.माधव भुरके यांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली.यातील ५ विद्यार्थी गंभीर असल्याने या विद्यार्थ्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले. आश्रम शाळेत ग्रामीण रुग्णालयाची टीम दाखल आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थांच्या प्रकृती बिगडत असल्याने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाची एक टीम आश्रम शाळेत पाठवण्यात आली आहे. एकूण परिस्थिती पाहता विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VbFJnHM

No comments:

Post a Comment