सांगली: भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयकाका पाटील आणि जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.भाजप नेते विलासराव जगताप विकृत बुध्दीचे आहेत,अशा शब्दात खासदार संजयकाका पाटलांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते विशाल पाटील आणि भाजपच्या विलासराव जगताप यांच्यावर खासदार संजयकाका पाटलांनी निशाणा साधलाय. विशाल पाटील म्हणजे माझ्यासाठी अदखल पात्र आहेत, असं त्यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तक्रार करणार असल्याचेही खासदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे, सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते. जत येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांनी जिल्ह्यासाठी कोणताही निधी आणला नाही,असा आरोप केला होता. संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील माझ्यासाठी अदखलपात्र आहेत,आणि त्यांना योग्य वेळ आल्यावर योग्य ते उत्तर देऊ, आता ती वेळ नाही,अशा शब्दात फटकारले आहे. नुकतंच भाजपाचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी देखील संजयकाका खेकड्याच्या वृत्तीचे असल्याची टीका केली होती. विकृत झालेल्या बुद्धींच्या मध्ये कशाला लक्ष घालायचं,अशा शब्दात खासदार संजयकाका पाटील यांनी पलटवार केला आहे. विरोधकांना योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ, दखल घ्यायची तेव्हा घेऊ, मी उत्तर द्यायला कुणाच्या बापाकडून २ रुपये खाल्ले नाहीत त्यामुळं उत्तर द्यायला वेळ कशाला घालवायचा, असं संजयकाका पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बद्दल बोलताना म्हणाले,जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. खून, हाणामारी,अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक राहिला नाही,जिल्हा नियोजन बैठकीत पोलीस प्रमुखांना सूचना करूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यस्था बाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून तक्रार करणार व कठोर पावले उचलण्याची मागणी करणार,असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले आहे. विलासराव जगताप काय म्हणाले होते? जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला होता .खासदार संजय पाटलांची वृत्ती म्हणजे खेकडे आणि विंचू प्रमाणे असल्याची जहरी टीका जगताप यांनी केली होती, तसेच त्यांच्या वागण्यात बदल देखील होणार, नसल्याची टीकाही माजी आमदार जगताप यांनी केली होती. ...
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rzqJMv0
No comments:
Post a Comment