नवी दिल्ली: आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लोक छोट्या छोट्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये (Small )) पैसे गुंतवतात. सुकन्या समृद्धी योजना, PPF आणि ज्येष्ठ नागरिक लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. सरकार दर तीन महिन्यांनी या लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा आढावा घेते. सरकारने गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी या योजनांवर नवीन दर जाहीर केले. सरकारने काही लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.३ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यामुळे ठेवींवरील वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. तथापि, पगारदार लोकांमध्ये लोकप्रिय असलेली बचत योजना पीपीएफवरील व्याजदर ७.१ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. (govt increases on small saving) या योजनांचे वाढले व्याजदर नवीन दरांनुसार, पोस्ट ऑफिसच्या तीन वर्षांच्या ठेवीवर आता ५.८ टक्के व्याज मिळेल. आतापर्यंत हा दर ५.५ टक्के होता. अशा प्रकारे, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत व्याजदर ०.३ टक्क्यांनी वाढेल. त्याच वेळी, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीसाठी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) वर आता ७.६ टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेवर आतापर्यंत ७.४ टक्के व्याज दिले जात आहे. किसान विकास पत्राबद्दल सांगायचे झाल्यास, सरकारने त्याचा कार्यकाळ आणि व्याजदर दोन्हींमध्ये बदल केला आहे. किसान विकास पत्रावरील व्याज आता ७.० टक्के असेल. हा दरपूर्वी ६.९ टक्के इतका होता. त्याच वेळी, तो आता १२४ महिन्यांऐवजी १२३ महिन्यांत मॅच्युअर होईल. रेपो दरात वाढ झाल्याने ठेवींवरील व्याज वाढले महत्त्वाचे म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे पासून रेपो दरात १.४ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बँका ठेवींवरील व्याजदरात वाढ करत आहेत. बँकांनी गेल्या काही महिन्यांत एफडीवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. सध्या RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (RBI MPC) बैठक सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीत व्याजदरात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. असे मानले जाते की RBRI व्याजदर ०.५० टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. सरकार घेते दर तीन महिन्यांनी आढावा सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दराचे तीन महिन्यांनी पुनरावलोकन करते. या पुनरावलोकनादरम्यान, व्याजदर वाढवायचे, कमी करायचे की स्थिर ठेवायचे याचा निर्णय घेतला जातो. हे व्याजदर अर्थ मंत्रालय ठरवते. यावेळी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C2btXA7
No comments:
Post a Comment