Breaking

Monday, September 26, 2022

एक दोन नव्हे तिनं ७३ वेळा नियम मोडला, अखेर दिप्ती शर्मानं धडाच शिकवला https://ift.tt/j3vPy6s

नवी दिल्ली : भारताच्या महिला टीमनं इंग्लंडच्या महिला संघाचा त्यांच्या मायभूमीत ३-० असा दारुण पराभव केला. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याची जोरदार चर्चा झाली. तिसऱ्या सामन्यात भारताला दिप्ती शर्मानं इंग्लंडच्या संघाची फलंदाज चार्लोट डीन हिला धावबाद करत विजय मिळवून दिला. दिप्ती शर्मानं ज्या प्रकारे चार्लोट डीनला बाद केलं त्यावरुन वाद सुरु झाले होते. दिप्ती शर्माची ती कृती नियमात बसणारी होती तरी देखील खेळ भावनेचा मुद्दा उपस्थित करत इंग्लंडच्या क्रिकेर्टर्सनी दिप्ती शर्मासह टीम इंडियावर टीका केली. भारतीय खेळाडूंनी देखील त्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. इंग्लंडचा एकमेव फलंदाज अॅलेक्स हेल्सनं दिप्ती शर्माचं समर्थन केलं. क्रीडा पत्रकार पीडर डेला पेन्या यांनी एक ट्विट करुन इंग्लंडच्या खेळाडूंना आरसा दाखवला आहे. पीटर डेला पेन्या काय म्हणाले? पीटर डेला पेन्या यांनी चार्लोट डीन हिनं नॉन स्ट्राइकर एंडवरुन ७३ वेळा क्रीज सोडलं होतं,असं सांगितलं. चार्लोट डीन ७३ व्या वेळी धावबाद झाली. म्हणजेच तिनं मैदानावर आल्यानंतर किमान ८५ टक्के बोलिंगवर क्रीज अगोदर सोडलं होतं. पीटर डेला पेन्या यांनी याबाबत स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. त्यामध्ये १८ व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूपासून हा प्रकार सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इंग्लंडच्या जशा विकेट पडू लागल्या तसं चार्लोट डीननं वारंवार क्रीज लवकर सोडलं. फ्रेया डेविस बॅटिंग करण्यासाठी आली तेव्हा चार्लोट डीन दोन फूट क्रीज सोडून पुढे जात होती. चार्लोट डीन हिनं वारंवार नियम मोडला होता. क्रिकेटचे नियम म बनवणाऱ्या एमसीसीनं देखील नॉन स्ट्राइकर एंडला असलेल्या फलंदाजांना इशारा दिला आहे. बोलर बोलिंग करत नाही तोपर्यंत क्रीज सोडू नये, असं एमसीसीनं म्हटलं आहे. हरमनप्रीत कौर काय म्हणाली? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या प्रकरणावर भाष्य करताना म्हणाली, ‘आज आम्ही जे काही केले, तो काही गुन्हा नाही. हा खेळाचा भाग आहे. आयसीसीच्या नियमात बसणारे आहे. त्यामुळे आमच्या खेळाडूला पाठिंबाच द्यायला हवा. खरे तर याबाबत चर्चा करण्याचीच गरज वाटत नाही, असेही ती म्हणाली. काय आहे मंकडिंग? भारताच्या विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर बिल ब्राउन यांना १९४७-४८च्या दौऱ्यातील कसोटी मालिकेत अशा पद्धतीने धावबाद केले होते. सिडनीत १२ ते १८ डिसेंबरदरम्यान ही कसोटी झाली होती. तेव्हापासून अशा पद्धतीने धावबाद केल्यास त्याला ‘मंकडिंग’ असे म्हटले जाऊ लागले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KyYx4dc

No comments:

Post a Comment