: सध्या बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुसळधार पावसाने दुपारपासून सुरुवात केली असून गेवराई तालुक्यामध्ये एक तीन वर्षीय चिमुकला पाय सरकल्याने नाल्यात पडून वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे. शोध केल्यानंतरही अद्याप तो मुलगा सापडू शकलेला नाही, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. ( was swept away in a stream in ) जिल्ह्यात पावसाने दुपारपासून चांगलीच सुरुवात केली असून त्यामुळे नदी नाले मोठ्या प्रमाणात दुथडी वाहत आहेत. अशात गेवराई तालुक्यातील बंटी ज्ञानेश्वर शिरसागर हा तीन वर्षीय चिमुकला बालवाडीतून घरी परत असताना त्याचा एका नाल्यात पाय घसरल्याने तो विद्रुप नदीत वाहून गेला. ही माहिती मिळताच अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस प्रशासनात दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्लिक करा आणि वाचा- मात्र, दुपारपासून या चिमुकल्याचा शोध सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारपासूनच मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी नाले ओढे दुथडी वाहू लागले आहेत आणि याच दरम्यान ही घटना घडल्याने यामध्ये जवळपास तीन वर्षाचा चिमुकला या नाल्याच्या पाण्यात वाहून विद्रूप नदीच्या पात्रात गेल्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. क्लिक करा आणि वाचा- याचाच शोध सध्या पोलीस प्रशासन घेत आहेत सध्या घटनास्थळी तहसीलदारासह पोलीस प्रशासनाची टीम या चिमुकल्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून त्याचे मुख्यालयाचा लवकरात लवकर शोध लावावा हीच प्रार्थना करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rUuopMH
No comments:
Post a Comment