Breaking

Sunday, September 4, 2022

खरी शिवसेना कोणाची? मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील गणेश मंडळाचा देखावा चर्चेत https://ift.tt/Op34079

ठाणे : ठाण्यात चित्रफितीच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना ( ), धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेना जनतेसाठी राबणाऱ्या शिवसैनिकांची खरी शिवसेना की केवळ मौज मजा करून पार्ट्या करणाऱ्यांची शिवसेना, अंगावर एकही केस न घेता, रात्रभर डिस्को पब उघडे ठेवायला सांगणारे खरे शिवसैनिक ( ) की एसी केबिनमध्ये बसून शाब्दिक विनोद करणारा खरा शिवसैनिक? असा सवाल या मंडळाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. या मंडळाने शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या बरोबरच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( ) यांचा इतिहास दाखवला आहे. एकनाथ शिंदे यांनी वैचारिक वादातून शिवसेनेत बंड पुकारलं. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे शिष्य असून खरे शिवसैनिक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आपल्या सोबत घेत थेट शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या विरोधात दंड थोपटले. त्यानंतर आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगत भाजपसोबत युती करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषविले. मात्र यानंतर शिवसेना कोणाची? यावरून वाद निर्माण होऊन त्यासाठी न्यायालयीन लढाई देखील सुरू झाली. मात्र खरी शिवसेना कोणाची? हे जनतेला दाखवून देण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील भवानीनगर येथील सार्वजनिक मंडळाने खरी शिवसेना कोणाची? हे अधोरेखित करणारी ध्वनी चित्रफित सादर केली आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर करण्यात आला. याध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून महाविकास आघाडी बरोबर शिवसेना का गेली होती? बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेची भूमिका कशी होती? त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका कशी होती? हे सगळे प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच या फितीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद का स्वीकारले? या विषयीचा इतिहास या फितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेना कशी होती आणि आता कशी आहे? आणि खरी शिवसेना कोणाची? हे मांडण्यात आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qH0zWdP

No comments:

Post a Comment