: सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एका विधवा महिलेने आपल्यावर झाल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीमध्ये विधवा महिलेने राष्ट्रवादीचे नेते व माजी महापौर मनोहर सपाटे यांवर गंभीर आरोप केले आहे. मनोहर सपाटे हे १९९३ साली सोलापूरचे महापौर होते. त्यावेळी ते एका संस्थेचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी एका संस्थेत काम करत असताना सपाटे यांची माझ्यावर वाईट नजर पडली. या संस्थेत काम करायचे असल्यास माझे ऐकावे लागेल अन्यथा नोकरीवरून काढण्याची धमकी त्यांनी दिली. मी सोलापूरचा महापौर आहे, असे सांगत वेगवेगळ्या धमक्या देत माझ्यावर अत्याचार केले असा आरोप पीडित विधवा महिलेने केला आहे. माजी महापौर सपाटे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (a widow made serious allegations against an in ) पीडित विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सोलापुरातील एका खाजगी संस्थेत सोलापूरचे प्रथम नागरिक व महापौर या नात्याने मनोहर सपाटे यांना बोलावण्यात आले होते. त्या खाजगी संस्थेत नोकरीला असणाऱ्या विधवा महिलेवर मनोहर सपाटेची वाईट नजर पडली. कार्यक्रमानंतर तत्कालीन महापौर सपाटे याने विधवा महिलेस कार्यालयात तू जवानीमध्ये विधवा झाली, तू माझे ऐकत जा, तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव अन्यथा तुला नोकरी वरून काढून टाकतो अशी धमकी देत , १५ ऑगस्ट १९९३ साली पहिल्यांदा अत्याचार केला, असा थेट आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन माझ्यावर सपाटे यांनी नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केला अशी फिर्याद सदर महिलेने सोलापूर शहर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. पीडित विधवा महिलेकडून १० लाख रुपये खंडणी उकळल्याचा आरोप मी १९९३ पासून तत्कालीन माजी महापौर मनोहर सपाटेचा यांच्याकडून शारीरिक अत्याचार सहन करत होते. मी निवृत्त होण्याअगोदर एक वर्षा अगोदर मला नोकरीचा राजीनामा द्यायला भाग पाडल्याचाही महिलेचा आरोप आहे. निवृत्तीमधून मिळणाऱ्या रकमेमधून १० लाख रुपयांची खंडणी देखील सपाटे यांनी मागितली. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.नाईलाजाने मी १० लाख रुपये मनोहर सपाटेला दिले आणि आपली सुटका करून घेतली, असे या पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. सपाटे हे माझ्या वयाच्या ५९ व्या वर्षी देखील माझ्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार करत होते, असे महिलेचा आरोप आहे. गावठी पिस्तूल लावून अत्याचार केल्याचाही केला आरोप पीडित विधवा महिलेने फिर्याद देताना असेही पोलिसांना माहिती दिली की, माझे वय २८ जून २०२२ रोजी वय वर्ष ५९ असतांना, मंदिरात पूजेसाठी गेले होते. त्यावेळी संशयित मनोहर सपाटे हा मंदिरात आला व जीवे मारण्याची धमकी देत, मंदिराच्या आवारात असलेल्या पत्रा शेडमध्ये घेऊन जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवत पिस्तुल डोक्यावर लावली जीवे मारण्याची धमकी दिली आणि अत्याचार केला. सन १९९३ पासून पीडित विधवा महिलेवर मनोहर सपाटे शारीरिक, मानसिक त्रास देत अत्याचार केला आहे, असे महिलेचे म्हणणे आहे.याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत. सपाटे यांनी सर्व आरोप फेटाळले दरम्यान, सपाटे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्वच्या सर्व आरोप फेटाळून लावले. ज्या महिलेने माझ्यावर बलात्काराचा आरोप केला, ती महिला मला माझ्या बहिणीसारखी आहे. त्यांना कालही मी ताई म्हणूनच हाक मारत होतो. आणि उद्याही ताई म्हणूनच हाक मारणार. असे असतानाही त्यांनी माझ्यावर नको ते आरोप केले. पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही त्या तक्रारीची खातरजमा करावी. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले. संबंधित महिलेने मी पिस्तूल दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला. पण माझ्या ७१ वर्षाच्या आयुष्यात मी अजूनही माझ्या हातात पिस्तूल घेतले नाही. माझ्याकडे त्याचे लायसन्सही नाही व कुणालाही दमदाटी केलेली नाही, असे सपाटे यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/j1tZx80
No comments:
Post a Comment