Breaking

Wednesday, September 21, 2022

तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणू का? आम्ही मिंधे नाही बाळासाहेबांचे खंदे:एकनाथ शिंदे https://ift.tt/qfWRIQe

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतील कार्यक्रमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिंदे गट, अमित शाह, भाजपवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी राज्यात बाप पळवणारी टोळी सक्रीय असल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला बापाचा विचार विकणारी टोळी म्हणून का असा सवाल केला. आम्ही मिंधे नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे असल्याचं प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात परिवर्तनाची गरज होती. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गानं पुढे जाण्याचा विचार केला होता, असं एकनाथ शिंदे यांना विविध राज्यांच्या प्रमुखांना सांगितलं. शिवसेनेच्या इतर राज्यातील प्रमुखांना भेट मिळत नव्हती. त्या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढं नेण्याचं तुम्ही काम केल्याचं सांगितलं. आम्ही केलेल्या परिवर्तनाची दखल जगातील ३३ देशांची दखल घेतली. ही संघर्षाची लढाई आम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी केली नाही. माझ्यासह ९ मंत्र्यांनी सत्ता सोडून हा निर्णय घेतला. सत्ता सोडून आम्ही हा निर्णय घेतला. देशातील आणि जगातील अनोखं उदाहरण होतं की आम्ही लोकांनी सत्तेचा त्याग केला. आम्हाला मुख्यमंत्री व्हायची अपेक्षा नव्हती,असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आम्ही शिवसेना आणि भाजपनं सोबत निवडणूक लढवली. एका ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला होता. आम्ही लोकांपुढं हिंदुत्वाची भूमिका घेऊन गेलो होतो. लोकांनी आमची भूमिका स्वीकारुन भाजप आणि सेनेच्या युतीला कौल दिला. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवली. शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन व्हावं असं वाटत होतं. लोकांना विश्वास देखील वाटत नव्हतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत आघाडी होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भाजपला बाहेर ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यात आलं. अडीच वर्षात अनेक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन आमच्या लोकांना तडीपार करण्यात आल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rElfgQP

No comments:

Post a Comment