: अखेर ४५ दिवसांनी धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहिता रंजीला वळवींचा मृतदेह बाहेर काढल्यात आला आहे. शवविच्छेदनात न्याय न मिळाल्याने आणि बलात्कार होऊन हत्या झाली असतांना केवळ आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप रंजीला हिच्या वडिलांनी केला आहे. या मुळेच तिचे वडील अंतरसिंग वळवी यांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार न करता मृतदेह ४५ दिवसांपासून मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता. दोन दिवसांपासून पोलीस तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शवविच्छेदनासाठी तिच्या कुटुंबीयांची समजूत काढत होते. अखेर कुटुंबीयांनी केलेल्या मुंबईतील शवविच्छदेनाच्या मागणीला प्रतिसाद देत पोलीस आरोग्य पथकासह आज सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार पोलिसांनी रंजीलाचा मृतदेह बाहेर काढून मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवला. (Ranjila's body, buried in a salt pit in Nandurbar, was sent to Mumbai for re autopsy) यांच्या मृत्यूनंतर एकदोन नव्हे, तर तब्बल ४४ दिवस उलटून देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला होता. मुलीवर बलात्कार होऊनही तिचा खून झाला असतांना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोदवुन घेतला. इतकेच नव्हे तर, शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काही तपासणीच करण्यात आली नाही. असा आरोप करत पीडित बापाने ग्रामस्थांच्या मदतीने व्यवस्थेविरोधातच लढा सुरू केला होता. याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर नंदुरबार पोलीस तत्परता दाखवत १३ सप्टेंबर रोजी धडगाव तालुक्यातील खडक्या गावी शवविच्छेदनासाठी दाखल झाले होते. मात्र रंजिला वळवींचे वडील आणि गावकऱ्यांनी मात्र त्याठिकाणी शवविच्छेदनास विरोध दर्शवला होता. रंजिला वळवी यांच्या मृतदेहावर मुंबई येथे अथवा मुंबई येथील तज्ञांकडुन शवविच्छेदन करण्याची मागणी कुटुंबीयांनी गावकऱ्यांनी केली होती. अखेर ४५ दिवसांनी धडगाव तालुक्यातील खडक्या येथील रंजिला वळवींचा मृतदेह बाहेर काढल्यात आला आहे. शवविच्छेदनात न्याय न मिळाल्याने आणि बलात्कार होऊन हत्या झाली असतांना केवळ आत्महत्येचा गुन्हाच दाखल झाल्याचा आरोप करत तिचे वडील अंतरसिंग वळवी यांनी अंतिम संस्कार न करता मृतदेह ४५ दिवसांपासून मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला होता. दोन दिवसांपासून पोलीस तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शवविच्छेदनासाठी तिच्या कुटुंबीयांची समजूत काढत होते. अखेर कुटुंबीयांनी केलेल्या मुंबईतील शवविच्छदेनाच्या मागणीला प्रतिसाद देत पोलीस आरोग्य पथकासह आज सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले होते. पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार मुंबईतील जे.जे रुग्णालयात रंजिला यांचा मृतदेह पुर्नशवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ci4SEHx
No comments:
Post a Comment