सांगली : जत काँग्रेसचे आमदार यांच्या माध्यमातून काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांनी त्यांचे सासरे अविनाश भोसले यांचा पैसा मनी लॉंन्ड्रीगच्या माध्यमातून गुंतवला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे. याप्रकरणी ईडीमार्फत सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी देखील माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. जतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. जगताप यांच्या या आरोपामुळे सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (BJP leader has demanded an investigation of Congress MLA Vishwajit Kadam through ED) जत तालुक्यातील काँग्रेस विरुद्ध भाजप असा वाद टोकाला गेला आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत आणि भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यातला वाद चांगलाच पेटला आहे. काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखालीतून चालवल्या जाणाऱ्या डफळापूर येथील दत्त नागरी पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात मनी रौंदिंगचा पैसा गुंतवणूक केल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- आमदार विक्रम सावंत यांचे पाहुणे असणारे विश्वजीत कदम यांचा आणि कदम यांचे सासरे अविनाश भोसले, जे सध्या ईडी कारवाईच्या अंतर्गत तुरुंगात आहेत, अशा या दोघांचेही पैसे विक्रम सावंत यांनी मनी लॉन्ड्रीगच्या माध्यमातून दत्त नागरी पतसंस्थेमध्ये गुंतवलेले आहेत. त्यामुळे आमदार विक्रम सावंत, विश्वजीत कदम आणि त्यांची पत्नी व त्यांचे सासरे अविनाश भोसले या सर्वांची ईडीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील विलासराव जगताप यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cBICVsp
No comments:
Post a Comment