Breaking

Saturday, September 24, 2022

टीम इंडियाचं झुलन गोस्वामीला फेअरवेल गिफ्ट, इंग्लंडच्या महिला संघाला व्हाइट वॉश https://ift.tt/XndLU5D

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघानं लॉर्डसवर इंग्लंडच्या महिला संघाचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतानं ३-० अशी मालिका जिंकली. भारतीय संघानं इग्लंडपुढं १७० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, इंग्लंडचा संघ १५३ धावांमध्ये गारद झाला. भारतीय गोलंदाजांपुढं त्यांची फलंदाजी निष्प्रभ ठरली. भारताची महान आणि अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी आजचा सामना खेळून निवृत्त झाली. झुलन गोस्वामीनं आज इंग्लंडच्या दोन विकेट घेतल्या. टीम इंडियानं मालिका विजयासह सर्वाधिक अनुभवी असणाऱ्या झुलन गोस्वामी हिला अनोखं गिफ्ट दिलं. टीम इंडियांनं इंग्लंडपुढं १७० धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनं त्यांच्या डावाची सुरुवात सावधपणे केली होती. बिनबाद २७ अशी धावसंख्या त्यांनी उभारली होती. यानंतर रेणुका सिंह हिनं तीन विकेट घेत इंग्लंडच्या संघाला धक्का दिला. झुलन गोस्वामी हिनं देखील आज दोन विकेट घेतल्या. इंग्लंडची अवस्था बिनबाद २७ वरुन ५० धावांच्या आतमध्येच ४ बाद अशी झाली होती. पुढे इंग्लंडनं आणखी तीन विकेट गमावल्यानं त्यांची अवस्था ६५ रन आणि ७ बाद अशी झाली होती. इग्लंडंची कप्तान एमी जोन्स आणि चार्ली डीन यांनी ३८ धावा केल्या, त्यामुळं मॅच रंगतदार स्थितीत पोहोचली होती. जोन्सला रेणुका सिंह हिनं २८ धावांवर बाद करुन आठवी विकेट मिळवली. ४७ धावा करणाऱ्या चार्लोट डीन हिला दीप्ती शर्मा हिनं बाद करत भारताच्या विजयातील अडथळा दूर केला. झुलन गोस्वामी हिला अखेरच्या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये कमाल दाखवण्यात आली नाही. मात्र, तिनं बोलिंगमध्ये इंग्लंडच्या दोन विकेट घेतल्या. झुलन मैदानावर बॅटिंगसाठी आली त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी तिला गार्ड ऑफ ऑनर दिला. झुलन गोस्वामीनं दोन विकेट घेतल्या तर तीन ओव्हर्स निर्धाव टाकल्या. इग्लंडनं टॉस जिंकून टीम इंडियाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. आजच्या टॉसवेळी झुलन गोस्वामी देखील कप्तान हिच्यासोबत मैदानावर उपस्थित होती. टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली होती. २९ धावांवर ४ विकेट गेल्या होत्या. सलामीवीर स्मृती मानधाना आणि दीप्ती शर्मा यांनी ५८ धावांची भागिदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. तर, स्मृती मानधाना हिनं ५० धावा केल्या. स्मृती बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या डावाची पुन्हा पडझड झाली. त्यामुळं भारताला १६९ धावा करता आल्या. दीप्ती शर्मानं ६८ धावा केल्या. त्यामध्ये सात चौकारांचा समावेश होता. पूजा वस्त्रकार हिनं २२ धावा केल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SDLtQjK

No comments:

Post a Comment