पुणे : विघ्नहर्ताच्या समोर आम्ही प्रार्थना करतो, देशात आणि राज्यात जे सत्तेत बसले आहे त्यांना सद्बुद्धी देवो. महागाई आणि बेरोजगार तरुणांच्या हाती काम मिळावं, अशी बाप्पा चरणी प्रार्थना केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( ) यांनी सांगितलं. गणेशोत्सव निर्बंध मुक्त होण्यावर शिंदे सरकार श्रेय घेत आहे. यावर पटोले यांना पत्रकारांनी विचारलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव हे कमी झाले आहे. आणि पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले. माझ्या नशिबाने भाव कमी झाले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत. मग आपल्याकडे म्हण आहे कावळा बसला आणि फांदी तुटली. तसं करोना कोणी आणला, त्यावर जायचं का? यांच्या कर्मामुळे करोना आला होता आणि ते देशाने भोगलं. त्याचंही श्रेय घ्यायला लावा ना यांना, असा टोला यावेळी पटोले यांनी लगावला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ( ) यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे देशाबाहेरील कामकाजासाठीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी केली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर नाना पटोले यांनी थेट उत्तर देणं टाळलं आणि मीडियावरच टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत आमच्याकडून कुठलीही माहिती गेलेली नाही. कशाला अशा बातम्या करता. महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बातम्या करा, असं यावेळी नाना पटोले म्हणाले. मुंबई येथे मनसेच्या कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण झाली आहे. यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री अधिवेशनात विरोधकांना धमकावत असल्याचं दिसलं. याआधी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राला गुजरात बनवायचं प्रयत्न सुरू आहे का? महाराष्ट्र हा पुरोगामी असून अशा विचारधारेला कुठेही थारा नाही. ज्या पद्धतीने एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे. तो जो माणूस ज्या पक्षाचा आहे. त्यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जात आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की त्यांना कशी ताकद मिळाली असेल. या घटनेचा मी निषेध करतो, असं नाना पटोले म्हणाले. शिंदे सरकारकडून अजूनही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आलेली नाही, याबाबतही पटोले यांना विचारण्यात आलं. हे सरकार अजूनही मलई खाण्यात व्यस्त आहे. यांना राज्यातील जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. लोकशाहीची थट्टा करण्याचं काम हे राज्यातील ईडीचं सरकार करत आहे, अशी टीकाही यावेळी नाना पटोले यांनी केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qQ2X3bG
No comments:
Post a Comment