सोलापूर: सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआय कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशमुख यांना धमकीचं पत्र पोस्टाने प्राप्त झाले आहे.थेट आमदारांनाच धमकी आल्यानं शहरात व भाजप गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश देत क्राईम ब्रँच कडे तपास सोपविला आहे. मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या हस्तलिखिता मध्ये १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र विजय देशमुख यांना पाठवलेले आहे.भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी ६ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त यांना भेटून पत्र पोलिसांच्या हवाली केले आहे. याची गंभीर दखल घेत ता पत्राच सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पीएफआयकडून धमकीचं पत्र? महिनाभरापासून राज्यात व देशभरात पीएफआय या संघटनेच्या ठिकठिकाणीच्या कार्यालयावर एनआयएचे छापे पडले होते.पीएफआयच्या कार्यकर्त्यांच्या राहत असलेल्या घरावर छापे मारून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. सोलापुरात सुद्धा पीएफआयच्या संघटनेच्या एका कार्यकर्त्यांवर कारवाई करून करून त्याला ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापुरातील भाजपचे आमदार विजय देशमुख यांना पीएफआयच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याची माहिती आमदार विजय देशमुख यांनी पोलीस आयुक्तांना दिली. भाजप आमदाराची पोलीस आयुक्तांना भेटून माहिती दिलीभाजप आमदार विजयकुमार देशमुख ६ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने यांची भेट घेऊन आपल्या स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात मोहम्मद शफी बिराजदार (रा.सहारा नगर, नई जिंदगी, मजरेवाडी सोलापूर) या इसमाने स्वतःच्या हस्तलिखिता मध्ये १ आक्टोंबर रोजी पोस्टाने हे पत्र विजय देशमुख यांना पाठवलेले आहे. सोलापूर शहर क्राईम ब्रँच कडे तपास या पत्रात पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्याकडून गलिच्छ भाषा वापरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे म्हटले आहे. या पत्राची पोलीस आयुक्त यांनी गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात क्राईम ब्रँचला चौकशीचे आदेश दिले आहेत.क्राईम ब्रँचचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी माहिती देताना सांगितले की,आमच्या कडे तपास आला आहे.हे पत्र कुठून आले,कुणी पाठवले याचा लवकरच तपास लावून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZUOoJF9
No comments:
Post a Comment